आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed Plot Of Tv Serial Honar Sun Mi Hya Gharachi

Xclusive :श्रीला सांगायचंय जान्हवीला गुपित,वाचा, काय पाहाल ह्या आठवड्यात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री सांगतोय, जान्हवीला पिंट्याच्या लग्नाचं गुपित
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत सध्या घरच्यांना पिंट्याच्या लग्नाची घाई झालीय. पण ह्या लगीनघाईमागे एक वेगळंच नाट्य घडतंय. ते फक्त श्री आणि पिंट्यालाच माहित आहे. श्रीने पिंट्याला एका मुलीसोबत पाहिलंय. आणि पिंट्याने जान्हवी समजून चुकून श्रीलाच आपलं त्या मुलीवर प्रेम असल्याची कबूली दिलीय.
पण ह्या सगळ्यापासून अनभिन्य असलेली जान्हवी मात्र पिंट्याच्या कांदेपोहेंच्या कार्यक्रमाची तयारी करतेय. पिंट्याच्या आईने मुलासाठी एक गावातली मुलगी पाहिलीय, आणि आता ती जान्हवीसकट घरातल्या सगळ्यांनाच पसंत पडल्याने घरचे खूप उत्साही आहेत. पण, मग आता पिंट्या अरेंज मॅरेज करणार कि लव्ह मॅरेज? त्याच्या ताईला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल कसे कळणार? की आता घरात काही नवीन वाद ओढवणार का? जान्हवीच्या ह्या नाजूक अवस्थेत श्री तिला हे गुपित कसं सांगणार? आणि धक्के मिळणं आणि ‘नसती’ सरप्राइजेस पासून नेहमी दूर असलेल्या जान्हवीला हे सरप्राइज मिळाल्यावर काय होणार? एवढे सगळे प्रश्न निर्माण झाल्याने divyamarathi.com ने साधला श्री-जान्हवीशीच संवाद.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जान्हवी सांगतेय, काय होणार मालिकेत