आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed \'Rajwade And Sons\'s \'Vikram\' Actor Amitriyaan, The New Chocolate Hero

Revealed: ‘राजवाडे अँड सन्स’चा पळून गेलेला मुलगा, विदर्भातला Chocolate Hero अमित्रियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘राजवाडे अँड सन्स’ ह्या चित्रपटात १३ व्यक्तिरेखा आहेत. पण चित्रपटाच्या पोस्टरपासून, प्रोमो आणि प्रमोशनमध्ये सूध्दा फक्त बाराच मंडळी दिसली होती. चित्रपट पाहताना हा तेरावा चेहरा म्हणजे, राजवाडेंचा पळून गेलेला मुलगा विक्रम असल्याचे उलगडते. तो जसा अचानक एक दिवस राजवाडेंच्या घरी येतो आणि कोणालाही न सांगता राजवाडेंच्या आयुष्यातून निघून जातो. आणि त्याविषयी पूर्ण चित्रपटभर उत्सुकता लागून राहते. तसाच ही व्यक्तिरेखा सादर करणारा अभिनेताही आहे. आपली फिल्म रिलीज होत असताना हा प्रसिध्दीपासून दूर राहिलेला अभिनेता आहे, अमित्रियान पाटील.
अमित्रियान जीममध्ये वर्कआउट करत असताना त्याला शेवटी divyamarathi.comने गाठलंच. आणि त्याला असं प्रसिध्दीपासून दूर असण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणला, “ही फिल्मची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. मुद्दामहून माझी व्यक्तिरेखा रिव्हील केली नव्हती. पण आता एक दोन दिवसात माझा प्रेझेंन्स असलेले प्रोमो सुरू करण्याचा प्लॅन आहे.”
अमित्रियानला भेटल्यावर लक्षात आलं, की ह्याला आपण रामगोपाल वर्माच्या ‘सत्या-२’ मध्ये नारा ह्या भूमिकेत पाहिलंय. रामूच्याच ‘३३२-मुंबई टू इंडिया’मध्ये आणि ‘मन्या-दि वंडरबॉय’ ह्या मराठी फिल्ममध्ये तो होता. त्याला ह्याविषयी विचारल्यावर तो म्हणला, “हो, ह्या फिल्म्स मी केल्यात. पण मी कधी इतर अभिनेत्यांसारखा प्रसिध्दीच्या फंदात न पडता, काम करत राहिल्याने मला सगळेच ‘इतके दिवस तू कुठे होतास?’ असा प्रश्न आता विचारतायत. मी ह्या फिल्म्सच्याही अगोदर राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘दिल्ली-6’मध्ये लक्ष्मणाची छोटी भूमिका केली होती. ‘बारा आणा’ फिल्ममध्ये मी एक ड्रग विकणा-याची भूमिका केलीय. मीरा नायरच्या फिल्ममध्येसुध्दा मी इरफान खानसोबत काम केलंय.”
प्रसिध्दीपासून दूर असलेला अमित्रियान divyamarathi.comशी बोलता-बोलता आपला वर्कआऊट करत होता. आणि ही मेहनत तो त्याच्या एका दहशतवादावर आधारित हिंदी चित्रपटासाठी घेतोय, हे त्याच्याशी बोलतना समजलं.
‘राजवाडे अँड सन्सच्या अगोदर अमित्रियानने बरंच स्ट्रगल केलंय. तो म्हणतो, “मी इथपर्यंत पोहोचायला, जवळ जवळ दहा वर्ष स्ट्रगल केलंय. मी मुळचा अकोल्याचा. कोणत्याही एक्टिंगस्कुलमधून शिकून आलो नव्हतो. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी तुम्ही FTII, NSD अशा किंवा मग कोणत्या ना कोणत्या मोठ्या नाट्य किंवा फिल्म संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले असाल, तर फरक पडतो. मराठी फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही पूण्या-मुंबईचे असाल, तर स्ट्रगल सोप्प होतं. अनेकजण मॉडेलिंग किंवा मग टीव्ही सिरीयल करून नाव कमावतात. पण मी ह्यातलं काहीच न केल्यामूळे माझं स्ट्रगल १० वर्षाचं झालं.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, स्ट्रगलच्या काळात उदरनिर्वाहासाठी अमित्रियानने केल्या शिकवण्या