आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revealed: का आहे, मुक्ता बर्वेचं नाटक ‘Code मंत्र’ सर्वात बिग बजेट नाटक? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनामिका-रसिका निर्मित ‘Code मंत्र’ नाटक मराठीतलं सर्वात बिग बजेट नाटक असण्याचं कारण आहे, त्यातले आर्मीचे ओरिजनल युनिफॉर्म. ‘Code मंत्र’ नाटकाला आर्मीची पार्शभुमी आहे. ते एका आर्मीच्या तळावर घडतं. अशावेळी नाटकातले सर्व कलाकार आर्मी युनिफॉर्ममध्येच दिसतात. नाटक खरंखुरं वाटवं, त्याकडे गांभीर्याने रसिकांनी पाहावं. ह्यासाठी नाटकाचे कपडे बनवणा-या एखाद्या डिझाइनरकडून हे युनिफॉर्म न बनवता निर्मात्यांनी ते चक्क आर्मीकडूनच मागवण्यात आलेत.
ह्या बातमीला दूजोरा देताना अभिनेता अजय पूरकर म्हणाले, “हो, आमच्या सगळ्यांचे युनिफॉर्म हे आर्मीकडून खास मागवले गेले होते. अगदी बारीकश्या एक-दोन चुका सोडल्या तर आमचे युनिफॉर्म हे तंतोतंत इंडियन आर्मीतल्या सैनिकांचेच युनिफॉर्म आहेत. चुका मुद्दामहून केलेल्या आहेत. ह्याचं कारण आर्मी युनिफॉर्मची कॉपी सामान्य नागरिकांनी करणं, आणि ते घालणं, हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे हा फरक जाणीवपूर्वक केला गेलाय. त्याचप्रमाणे जेव्हा हे नाटक बंद होईल. तेव्हा हे सर्व युनिफॉर्म आर्मीला परत करणं निर्मात्यांना बंधनकारक आहे.”
“आपले युनिफॉर्म आर्मीकडून आलेत. ह्याचा आम्हा प्रत्येक कलाकाराला अभिमान आहे. देशभक्ती मनात आहेच. पण ती भिनायला, ह्या आर्मीच्या युनिफॉर्ममूळे खूप मदत होते, असं आता हा युनिफॉर्म घातल्यावर वाटतं.”
निर्माती मुक्ता बर्वे म्हणते, “ आर्मीचे ओरिजनल युनिफॉर्म आर्मीकडूनच शिवून घेतले. त्याचप्रमाणे मराठा बटालियनची घोषणा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही सुध्दा आहे. अशा अनेक गोष्टींमूळे नाटक जास्त खंर वाटू लागतं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुक्ता बर्वेच्या कोडमंत्र नाटकाचे फोटो
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...