आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : क्लासमेट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक कलावंतांची एन्ट्री आणि अभिनय दमदार झाला आहे. दाद मिळवणारे अंकुश, सई, सचित आणि सिद्धार्थ चित्रपटाशी एकदम एकरुप झालेले वाटतात. तर सुंदर सोनाली चित्रपटाला थोडे रहस्यमय करते. आदित्य सरपोतदार या युवा पिढीच्या दिग्दर्शकाने मराठीतील तरुणाईला आकर्षित करणारा चित्रपट दिला आहे.
कथा
एका कॉलेजात शिकणाऱ्या अप्पू उर्फ अपर्णा, सत्या, रोहित उर्फ स्विमर, अनिरुद्ध उर्फ अनि आणि आदिती यांच्याभोवती फिरणारे हे कथानक आहे. कॉलेजमध्ये लव्ह, दोस्ती, रिलेशनशिप आणि कॉलेजमधील निवडणूकीतील तणाव चित्रपटात आहेत. सत्या या कॉलेजच्या हिरोभोवती सगळेजण कायम राहतात. अप्पु त्याच्यावर जिवापाड प्रेम करते, तर अनि त्याला खूप जीव लावतो. कॉलेजमध्ये प्रत्येकाची सिक्रेट माहिती असलेला अनि अतिशय प्रेमळ, म्युझिक लव्हर मुलगा. सत्यावर जीव टाकणारा. रोहनचे वडील राजकारणी. रोहनला मात्र स्विमिंगमध्ये करिअर करायचे असते. अशावेळी एक घटना घडते जिच्यामुळे रोहन राजकारणात येतो. मग कॉलेजच्या निवडणूकीत खतरनाक राजकारण करत आदितीला विजयी करतो. आदिती आणि सत्याचे एकमेकांवरचे जीवापाड प्रेम या निवडणूकीत विरुन जाते. यातून एका मित्राचा मृत्यू होतो, पूढे हा मृत्यू सर्वांचे आयुष्य अंर्तबाह्य बदलून टाकतो.

अभिनय
सई ताम्हणकर या चित्रपटात टॉमबॉय लुकमध्ये पहिल्यांदाच दिसली. अंकूश चौधरी आणि सई संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेले. सिद्धार्थ चित्रपटाची जान होता. त्याने कॉलेजमधला चॉकलेट बॉय आणि भावुक मुलगा उत्तमपणे साकारला. तर सुशांत, सोनाली, सचित यांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात अचुकपणे उतरवल्या.

संवाद
क्षितीज पटर्वधन यांनी लिहीलेले संवाद तरुणाई लोकप्रिय होतील असे आहेत. शिवाय चित्रपटगृहातच भरभरुन दाद मिळवणारे आहेत. अंकुशच्या तोंडी असलेला दर्जा हा खास शब्द, तर सईच्या तोंडी असलेल्या शिव्या तुफान टाळ्या अन शिट्या घेऊन जातात.
सार
कॉलेजच्या रम्य विश्वात नेऊन ठेवणारा हा चित्रपट आहे. शेवटपर्यंत प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची ताकद असलेली पटकथा समीर विद्धंस यांनी ताकदीने लिहीली आहे. तर चमकदार संवाद क्षितीज पटर्वधनने दिले आहे. सर्व कलाकार क्षणोक्षणी दाद घेणारे आहेत. उत्तम चित्रीकरण, तंत्रकौशल्य आहे. मराठी चित्रपट कात टाकून नव्या दमाने प्रेक्षकांसमोर आला आहे. नवी समीकरणे मांडणारा हा चित्रपट आहे. शेवटपर्यंत रहस्यमय आणि रंजकता असल्याने चित्रपट बॉक्स ऑफीसवर धमाल करणारेय.