आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'मुळे पालटले या चौघांचे नशीब, जाणून घ्या आयुष्यात काय-काय घडले बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नशीब पालटायला एक संधी पुरेशी असते. पण त्या संधीचे सोने करता येणेही महत्त्वाचे असते. अशीच एक संधी मिळाली सोलापूरच्या काही तरुणांना आणि त्यांनी मिळालेल्या या संधीचे सोने केले. आम्ही बोलतोय ते सैराट सिनेमात झळकलेल्या रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांच्याविषयी. या चौघांची प्रमुख भूमिका असलेल्या सैराट या सिनेमाच्या रिलीजचा आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २९ एप्रिल २०१६ रोजी त्यांचा सैराट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि त्याने प्रेक्षकांना भूरळ घातली. त्यांची ही जादू आजही कायम आहे. खरं तर एखादा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याची फार तर फार पंधरा-वीस दिवस चर्चा होते. मात्र सैराट हा सिनेमा अपवाद ठरला आहे. दोन महिन्यांनंतरसुद्धा या चौघांची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. 'सैराट'मुळे या चौघांच्या आयुष्यात नेमके कोणकोणते बदल घडले आहेत, याची खास माहिती आम्ही त्यांच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात, 'सैराट'मुळे काय काय बदल घडले आहेत या चौघांच्या आयुष्यात जाणून घेऊयात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...