आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले... बघा अकलूजमध्ये क्लिक झालेले रिंकूचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज (सोलापूर) : 'सैराट' सिनेमाच्या प्रदर्शानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु रविवारी पहिल्यांदाच अकलूजमध्ये आली होती. 'सन्मान कलावंतांचा, नावलौकिक अकलूजचा' या कार्यक्रमात यावेळी रिंकूचा सत्कार करण्यात आला. तब्बल तीन महिन्यांनंतर सेलिब्रिटी होऊन रिंकू आपल्या शहरात आली होती. यावेळी तिची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती.
अकलूज येथील चित्रपट क्षेत्रातील उज्वल परंपरा राखताना रिंकू हिने अकलूजवासियांचे नाव मोठे केल्याचे सांगत, तिला महाराष्ट्रीयन फेटा बांधून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना ‘अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची’ हा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी बोलताना रिंकू म्हणाली, मी खूप लाजरी-बुजरी होते. नागराज मंजुळेंनी माझ्यातील खरी आर्ची बाहेर काढली.

यावेळी रिंकू ग्रे कलरच्या सलवार-सूटमध्ये अतिशय सुंदर दिसली. या कार्यक्रमात क्लिक झालेली रिंकूची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रिंकूचे वेगवेगळे Expressions...
(फोटो सौजन्यः गणेश जामदार)