आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्लास्टीक बंदीसाठी 'आर्ची'चा असणार आग्रह, लवकरच होणार ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'सैराट' चित्रपटात आर्ची लंगड्या आणि परश्याला गुटखा खाल्ल्यामुळे आर्चीने चांगलेच सुनावण्याचा सीन तुम्हाला लक्षात असेल. रिल आयुष्यातच नाही तर आता रिअल लाईफमध्ये आर्ची अर्थात रिंकू राजगुरु समाज प्रबोधनाचे काम करणार आहे. रिंकूची लवकरच प्लास्टीक बंदी अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 

 

राज्यात आता सरकार लवकरच प्लास्टीकबंदीचा निर्णय घेऊ शकते. या अभियानात अभिनेता सिद्धार्थ जाधवचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. केवळ मराठी कलाकारच नाही तर बॉलिवूड कलाकारही या अभियानात सहभागी होण्याची चिन्हे आहेत. मराठी आणि बॉलिवूड असे मिळून एकूण 5 कलाकार या अभियानासाठी निवडण्यात येणार आहेत. येत्या 15 दिवसात हे 5 कलाकार कोण असणार याबद्दल आपल्याला कळणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेता सिद्धार्थ जाधवचाही प्लास्टीक बंद अभियानात असणार हात..

बातम्या आणखी आहेत...