आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'च्या आर्चीच्या या अदा तुम्हाला वेड लावतील, फोटो पाहा लाईक आणि शेअर करा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राची सध्या सर्वात जास्त चर्चा असलेली मराठी अभिनेत्री कोण असे कोणालाही विचारले तर एकच नाव ऐकायला मिळेल. ते म्हणजे सैराट फेम रिंकू राजगुरू. रिंकू आता दहावीत गेली आहे. एका मुलाखतीत सांगताना रिंकू म्हणाली की, सातवीत असताना तिला हा चित्रपट ऑफर झाला. त्यानंतर नववीत असताना हा चित्रपट रिलिज झाला. आता रिंकूने नववीची परिक्षा चांगल्या मार्काने पास होऊन दहावीत प्रवेश केला आहे. यंदाचे तिचे हे महत्त्वाचे वर्ष असून तिच्या अभ्यासाची जबाबदारी पालक तसेच वर्गशिक्षक यांनी उचलली आहे.
रिंकू ही अत्यंत कमी वेळेत सुपरस्टार बनली आहे. चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा आहे. त्यामुळेच तिला सैराटमधील आर्चीच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
सांगलीत एका दुकानाचे उद्घाटन करायला रिंकू गेली असताना तिची एक झलक पाहाण्यासाठी संपूर्ण रस्ता जाम झाला होता. चाहत्यांची अशी गर्दी तर भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही कधी अनुभवायला मिळाली नसेल. एवढच नाही तर सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवर रिंकूच्या नावाचे २५-३० पेजेस आहेत. आणि त्या प्रत्येक पेजला ५० हजारांपर्यंत लाईक आहेत. रिंकूचे चाहते रिंकूच्या फोटोंसाठी वेडे झाले आहेत.
मागील १५-२० दिवसांत रिंकू राजगुरूचे काही फोटो एवढे वायरल झाले आहेत की, त्या प्रत्येक फोटोला किमान ५-१० हजार लाईक आणि शेकडो कमेंट आल्या आहेत. त्यातीलच काही अत्यंत सुंदर असे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. तुम्हालाही हे फोटो पाहायला खुपच आवडेल.
पुढील स्लाईडवर पाहा, रिंकू राजगुरूचे सर्वात जास्त व्हायरल झालेले फोटोज... या फोटोंमध्ये ती दिसते फार गोड....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)