(रितेश आणि जेनेलिया देशमुख)
लातूर - एखादा मराठी पती
आपल्या पत्नीला मुलाचे नाव घेत चिंटूची आई आणि त्याची मराठमोळी पत्नी आपल्या पतीला अहो चिंटूचे बाबा अशी लाडिक हाक मारते हे मध्यमवयीन चित्र खरतरं लोप पावत चाललंय. त्यातही अशी हाक मारणारा बाबा मराठी असला तर त्यात तसं नवल नाही...पण त्याच्याहून लाडिक हाक मारणारी त्याची पत्नी दाक्षिणात्य असेल तर...होय अशी हाक मारणारा बाबा आहे हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता रितेश आणि त्याची पत्नी आहे ती अभिनेत्री जेनिलिया डिसुझा-देशमुख.
रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नाचा मंगळवारी वाढदिवस होता. या दोघांनी आपला वाढदिवस चक्क
ट्विटरवर परस्परांना शुभेच्छा देऊन साजरा केला. काही दिवसांपूर्वीच आई-वडील झालेल्या या जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव रिआन ठेवलंय. त्याचाच संदर्भ घेत रितेश देशमुखने मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रिआनची आई मॅरेज अॅनिव्हरसरीच्या शुभेच्छा बरं का असं ट्विट केलं. सोबत दोघांचा रोमँटिक मूडमधला एक फोटोही अपलोड केला. या शुभेच्छांचा स्वीकार करतानाच जेनिलियानंही अगदी मध्यमवर्गीय पद्धतीनं अहो रिआनचे बाबा का लाजवताय. तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं चक्क मराठीतून ट्विट केलं. एरवी इंग्रजीतून आपल्या भावना-मते व्यक्त करणार्या या बॉलीवूडमधल्या आघाडीच्या जोडप्यानं केलेलं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं.
खर तरं सध्या मध्यमवर्गीयच नव्हे तर अगदी खेड्यापाड्यांतही वडिलांना पप्पा, डॅडी झालंच तर पॉप्स आणि आईला मम्मी म्हणण्याचं फॅड आलंय. अशाकाळात हिंदी चित्रपटसृष्टीतलं हे आघाडीचं जोडपं एकमेकांना आपल्या बाळाची आई आणि बाबा म्हणतेय हीदेखील एक नवी बाब म्हणावी लागेल. यापूर्वीही जेनिलिया देशमुखने ती प्रोड्युसर असलेल्या ‘लय भारी’ चित्रपटातल्या माउली माउली गाण्याच्या पार्श्वसंगीतावर प्रजासत्ताकदिनी निघालेल्या चित्ररथाच्या बाबतीत एक ट्विट केलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबांमानी ऐकलेलं पहिलं मराठी गाणं मी प्रोड्युसर असलेल्या चित्रपटातलं असल्याचा अभिमान आहे असं ट्विट जेनिलियाने केलं होतं. जेनिलियानं या चित्रपटातल्या एका गाण्यात गेस्ट अॅपिरन्सही दिलेला आहे. क्रिकेट स्पर्धांमधूनही या सतत हसर्या जोडप्यानं आपला संघ उतरवून रंगत आणली होती.
ट्विट पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...