आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish Announced His Future Project I.e Marathi Film “Mauli”.

रितेशची 'लय भारी'नंतर आता 'माऊली'च्या रूपात मराठीत पुन्हा एकदा अॅक्शनवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'माऊली' सिनेमाचे पोस्टर आणि रितेश देशमुख - Divya Marathi
'माऊली' सिनेमाचे पोस्टर आणि रितेश देशमुख
निशिकांत कामत दिग्दर्शित 'लय भारी' द्वारे मराठमोळ्या रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटाच्या धर्तीवर आता तो मराठीमध्येच एक अॅक्शन चित्रपट बनवत आहे.
2003 मध्ये 'तुझे मेरी कसम'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या रितेश देशमुखने 'क्या कूल हैं हम', 'हाऊसफुल', 'ग्रँड मस्ती' अशा बोल्ड चित्रपटांद्वारे आपले इंडस्ट्रीतील स्थान भक्कम केले. मात्र, त्यानंतर मराठमोळ्या रितेशला मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आणि तेथून हिंदी चित्रपटामुळे तयार झालेली इमेज बदलण्याची रितेशची धडपड सुरू झाली. 'लय भारी'द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबरोबरच त्याची या चित्रपटाने इमेजदेखील बदलली. आता रितेशचा 'बँगिस्तान' हा कॉमेडी चित्रपट 31 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय रितेश मराठीमध्ये 'माऊली' नावाने एक अॅक्शन चित्रपट बनवणार असल्याचे समजते.
रितेशने मराठीतील आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलताना सांगितले की, 'माऊली' एक व्यावसायिक अॅक्शन चित्रपट असून मराठी प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन याचे कथानक तयार करण्यात आले आहे. यंग ब्रिगेडबरोबरच संपूर्ण कुटुंबांना मराठी चित्रपटाकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातूनच मराठीमध्ये अॅक्शन चित्रपटांचा ट्रेंड आम्ही रुजवू पाहतो आहोत.
निशिकांत कामत 'माउली'चे दिग्दर्शन करणार आहेत. 'एक व्हिलन' आणि मराठीतील मसाला चित्रपटांबरोबरच रितेशने आपला कॉमेडीचा जॉनर कायम ठेवला आहे. याबाबत त्याने सांगितले की, "मी कॉमेडी चित्रपट का म्हणून नाकारावेत ? मला साजिद नाडियाडवालांनी यावर सल्ला देताना सांगितले होते की, जर लोकांना कॉमेडी चित्रपट आवडत असतील तर ते आपण केलेच पाहिजेत. पण हे करताना काही वेगळ्या भूमिका साकारण्याचा आपला आग्रह असला पाहिजे."
पुढे वाचा, रिुतेश वळला पुन्हा प्रौढ कॉमेडीकडे...