आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लय भारी\'नंतर आता \'माऊली\', रितेश देशमुखने शेअर केले आगामी मराठी सिनेमाचे पोस्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आगामी 'माऊली' या सिनेमाचे पोस्टर, इनसेटमध्ये रितेश देशमुख)

'लय भारी' या सिनेमाद्वारे अभिनेता रितेश देशमुख मराठी सिनेसृष्टीत अवतरला. त्याच्या या सिनेमाने तिकिटबारीवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. या सिनेमानंतर रितेश पुन्हा मराठीत कधी दिसणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली होती. चाहत्यांची ही उत्सुकता आता संपली आहे. कारण पुढच्या वर्षी 'माऊली' या सिनेमाद्वारे रितेश मराठी पडद्यावर अवतरणार असल्याची शक्यता आहे.
स्वतः रितेशने सोशल साइटवर 'माऊली' या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज करुन सिनेमाविषयीची माहिती दिली. या सिनेमाची निर्मिती जेनेलिया देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. याव्यतिरिक्त सिनेमाविषयी फार काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र पुढच्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
खरं तर 'लय भारी' या सिनेमात रितेशने साकारलेल्या पात्राचे नाव माऊली होते. त्यामुळे हा सिनेमा 'लय भारी'चा सिक्वेल असणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय. 'लय भारी' सिनेमा दिग्दर्शित करणारे निशिकांत कामत यांनीच माऊलीच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
एकंदरीतच काय तर 'लय भारी'नंतर रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत आपला डंका वाजवणार हे नक्की.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा, रितेश देशमुखने फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट...