आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुख बनणार छत्रपती शिवाजी महाराज.. जेनेलिया बनवणार फिल्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश बनणार शिवाजी महाराज
बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असतानाच, आता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सिल्व्हर स्क्रिनवर घेऊन येतोय.
रितेश देशमुखचे प्रॉडक्शन हाऊस ‘मुंबई फिल्म कंपनी’ ह्या चित्रपटाची निर्मिती करणार असून जेनेलिया देशमुख ह्या चित्रपटाची निर्माती असणार आहे. ह्य़ा चित्रपटात रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असेल.
ह्या फिल्मच्या संहितेवर सध्या काम सुरू आहे. आणि लवकरच सिनेमाचे शुटिंगही सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असंही समजतंय.
जेनेलिया देशमुखच्या शब्दात सांगायचे तर “छत्रपती शिवाजी महाराजांवर फिल्म करणे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आम्ही त्यांच्यावर फिल्म करण्यासाठी खूप उत्सुक आहोत.” अंदाजे 15 ते 20 करोड ह्या चित्रपटाचे बजेच असल्याचे समजते आहे. त्यामूळे ही फिल्म नक्कीच आजपर्यंत मराठीत बनलेली सगळ्यात बिग बजेट फिल्म असणार आहे. रवि जाधव आणि रितेशच्या असोसिएशनची पहिली फिल्म ‘बालक-पालक’ सुपरहिट ठरली. आणि आता हा सिनेमा मराठीतला भव्य सेट आणि VFXच्या मदतीने बनणारी फिल्म असणार आहे.
सध्या रितेश देशमुख यशराज फिल्म प्रॉडक्शनचा ‘बँकचोर’ हा हिंदी चित्रपट करत आहे. त्यानंतर ह्या चित्रपटावर रितेश आपलं लक्ष केंद्रीत करेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जेनेलियाने केली ट्विटरवरून ह्या चित्रपटाची घोषणा