आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#TeaserFaFe is here!! ‪पुस्तकातून पडद्यावर तो आलाय... बघा \'फास्टर फेणे\' आहे तरी कोण? ‬

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 काही दिवसांपूर्वी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फच्या बाराखडीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हे सेलिब्रिटी फची बाराखडी का म्हणत असावे, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर त्याचा उलगडा झाला. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची निर्मिती असलेल्या नवीन मराठी चित्रपटासाठी वापरण्यात आलेला हा हटके प्रमोशन फंडा असल्याचे उघड झाले. 'फास्टर फेणे' हे या चित्रपटाचे नाव असून आता या चित्रपटाचा पहिला टीजर रिलीज करण्यात आला आहे.
 
चित्रपटाच्या पोस्टरवर पाठमोरा उभा असलेला हा फास्टर फेणे अखेर कोण आहे, हे टीजरमध्ये रिव्हिल करण्यात आले आहे. हा फास्टर फेणे आहे अभिनेता अमेय वाघ. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला आणि 'मुरांबा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अमेय फास्टर फेणे या चित्रपटात लीड रोलमध्ये झळकतोय. तर चित्रपटात त्याला साथ लाभली आहे ती अभिनेत्री पर्ण पेठे हिची. टीजरमध्ये अमेयची झलक दिसली असली आहे. मात्र पर्ण पेठे या टीजरमध्ये दिसत नाहीये. 

अभिनेता आणि या चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुखने चित्रपटाचा टीजर सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन लिहिले, "चाहूल लागताच रहस्यांची त्याला क्षणात येते जाग, मोठा झालाय भा. रा. भागवतांचा फाफे, आता कोणाचा काढतोय माग...?" 

तर अमेयने टीजरची लिंक शेअर करुन लिहिले, "Me yetoy! The first look of Faster Fene! Bagha, vaata , avdun ghya :) #fafe #tockkk" 

येत्या 27 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘फास्टर फेणे’ हे प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांनी जिवंत केलेलं एक लोकप्रिय पात्र. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलेलं. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं.

पुढील स्लाईडवर बघा,  'फास्टर फेणे'चा टीजर... 
बातम्या आणखी आहेत...