आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी जेनेलियासोबत मराठी सिनेमात काम करण्याचे स्वप्न बघतोय रितेश, स्वतः दिली कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हिंदीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. 'लय भारी' या सिनेमातून रितेशने मराठीत पदार्पण केले. मराठीत केवळ त्याने अभिनयच केला नाही तर 'यलो' या सिनेमाची निर्मितीसुद्धा केली. आता पुन्हा एका मराठी सिनेमावर रितेश काम करतोय. हिंदीत पत्नी जेनेलियासोबत निवडक सिनेमे केल्यानंतर आता मराठीत तिच्यासोबत काम करण्याचे स्वप्न तो बघतोय. याची कबुली स्वतः रितेशने दिली आहे.
अलीकडेच रितेश त्याच्या आगामी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधत होता. त्यावेळी तो म्हणाला, "माझी आवडती हीरोईन आणि पत्नी जेनेलियासोबत मला मराठी सिनेमात काम करायचे आहे. ते माझे स्वप्न आहे."

आणखी काय म्हणाला रितेश, वाचा पुढील स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...