आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फास्टर फेणे'नंतर रितेश गुंतणार नव्या प्रोजेक्टमध्ये, साईन केला हा चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुखची निर्मिती असलेला चित्रपट 'फास्टर फेणे'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही रितेशच्या या चित्रपटाचे कौतुक होत आहे. आता फास्टर फेणेनंतर रितेश निर्मितीक्षेत्रात पुढे जाण्यासाठी अभिनय सोडणार का अशी शंका त्याच्या चाहत्यांना आली होती. पण रितेशने एक सिनेमा साईन केल्याची बातमी मिळत आहे. 

 

रितेशने 'धमाल' सिरीजचा तिसरा चित्रपट 'टोटल धमाल' साईन केला आहे. या चित्रपटातून रितेश पुन्हा त्याच्या प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. दिग्दर्शक इंदर कुमार यांचा या चित्रपटाचा पहिला भाग 2007 साली आला होता. त्यानंतर 2011 साली या चित्रपटाचा सिक्वल 'डबल धमाल'ही आला होता आणि आता 'टोटल धमाल' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. टोटल धमालमध्ये संजय दत्तऐवजी अजय देवगण भूमिका करणार असल्याची बातमी आहे. 

बातम्या आणखी आहेत...