आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: रितेश देशमुखने नाकारली अक्षयकुमारची मराठी फिल्म ‘दादा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षयकुमार आणि अश्विनी यार्डी यांच्या ‘ग्रेझिंग गोट’ प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेली आणि संजय जाधव दिग्दर्शित फिल्म ‘दादा’ १ जानेवारी २०१६ला प्रदर्शित करण्याचा अक्षयकुमारचा मानस असल्याचे divyamarathi.comने याअगोदरच सांगितले होते. हा चित्रपट लोकप्रिय अभिनेते स्वर्गीय दादा कोंडके ह्यांच्यावर बनणार असल्याच्या बातमीला दिग्दर्शक संजय जाधवने दूजोराही दिला होता.
याहून अधिक माहिती प्रॉडक्शन हाऊस किंवा संजय जाधव आणि अक्षयकुमार सांगत नव्हते. पण divyamarathi.comला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनूसार, ह्या चित्रपटाच्या संहितेवरचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून, ह्या चित्रपटात दादांची मुख्य भूमिका रितेश देशमुखला ऑफर करण्यात आली होती.
खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेल्या माहितीवरून असेही कळते, की, “दादा कोंडके यांची भूमिका निर्माती अश्विनी यार्डीने ऑफर केल्यावर, तिने संहितेसह, एक दादांविषयीचे पुस्तकही रितेशला वाचायला दिले होते. आणि रितेशला सुरूवातीच्या काळात अशी वेगळी आणि मराठीतल्या एका दिग्गज अभिनेत्याची भूमिका साकारायला मिळणार, याविषयी खूप एक्सायमेंटही होती. मात्र नंतर रितेशनेही भूमिका नाकारली.”
सूत्रांनी पूढे सांगितले आहे की,”रितेशने अश्विनी आणि अक्षयला आपल्या व्यस्ततेचे कारण सांगितले आहे. त्यामूळे आता अक्षय आणि अश्विनी पूढे दूसरा अभिनेता शोधण्यावाचून पर्याय नाही. सध्या शोध सुरू आहे.”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, का नाकारली असावी दादा कोंडकेंची फिल्म रितेशने? आणि अक्षयच्या ‘दादा’चे असेल काय वैशिषठ्य?