आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look :रितेश देशमुखचा माऊली, आषाढीच्या मुहूर्तावर रिव्हिल केले पोस्टर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितशे देशमुखच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर
आषाढी एकादशी हा रितेश देशमुखसाठी महत्वाचा उत्सव आहे. त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटात त्याची विठ्ठलभक्ती त्याने दाखवलीच. 'लय भारी' चित्रपट आषाढीच्याच वेळी गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आणि आता ह्यावर्षी रितेशने आषाढी एकादशीला सोशल नेटवर्किंग साइटवरून त्याच्या ‘माऊली’ ह्या आगामी चित्रपटाचे मराठी पोस्टर लाँच केले आहे.
'माऊली'चे पहिले इंग्रजी पोस्टर ह्या अगोदर रितेशने सोशल नेटवर्किंग साइटवरून अनविल केलं होते. आणि आता रितेशने त्याच्या ह्या चित्रपटाचे मराठी पोस्टर लाँच केले आहे.. या सिनेमाची निर्मिती जेनेलिया देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. आणि 'लय भारी'चाच दिग्दर्शक निशिकांत कामत ह्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करेल. पुढच्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
खरं तर 'लय भारी' या सिनेमात रितेशने साकारलेल्या पात्राचे नाव माऊली होते. त्यामुळे हा सिनेमा 'लय भारी'चा सिक्वेल असणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय. लय भारी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला. आता पहिला चित्रपट लय भारी जसा २०१४च्या आषाढीला रितेश घेऊन आला. आणि दुस-या चित्रपटाचे पोस्टर २०१५ आषाढीच्याच दिवशी त्याने लाँच केले. तसेच २०१६च्या आषाढीला 'माऊली' येईल, असंच वाटतंय.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'माऊली' चित्रपटाचे पोस्टर