आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेपार फडकली ‘लय भारी’ पताका, गगनात मावेनासा झाला रितेश-जेनेलियाचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयफा सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर सेल्फी घेताना रितेश आणि जेनेलिया)
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर ‘लय भारी’ कमाई केली. आणि ‘लय भारी’ पुरस्कारही घेतले. आता अजून एक मानाचा पुरस्कार ‘लय भारी’च्या शिरपेचात खोवला गेला आहे, आणि तो म्हणजे आयफा पुरस्कार.
‘लय भारी’ने नुकत्याच मलेशियात संपन्न झालेल्या 16 व्या आयफा पुरस्कारांमध्ये प्रादेशिक चित्रपटांच्या पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे. या सोहळ्यात ‘लय भारी’ला ‘सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा’ सन्मान मिळाला आहे.
रितेश देशमुखवर आता सोशल नेटवर्किंग साइटवरून यासाठी अभिनंदनचा वर्षाव होऊ लागला आहे. बातमी कळताच रितेशच्या लहान भावाने धीरजने रितेश आणि जेनेलियाचं या पुरस्कारासाठी सोशल नेटवर्किंग अभिनंदन केलं आहे. धीरजने ट्विट केले, ''Super Proud dada & Vahini ,4 iffa Best Regional Film, Marathi Lai Bhaari, starring @Riteishd and co-produced @geneliad @mfc''
रितेश देशमुखसाठी तर या पुरस्कार सोहळ्यात डबल धमाकाच आहे, असं म्हणावं लागेल. लय भारीला तर पुरस्कार मिळालाच आहे. पण त्यासोबतच रितेश देशमुखला त्याच्या एक व्हिलन चित्रपटातल्या भूमिकेसाठी सुध्दा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या रितेश आणि जेनेलिया दोघंही खुश आहेत.

आयफा पुरस्कार विजेत्यांची नावे खालील प्रमाणे -
पुरस्कारविजेतेसिनेमा
बेस्ट अॅक्टर इन निगेटिव रोलकेके मेननहैदर
बेस्ट डेब्यू मेल
टायगर श्रॉफहीरोपंती
बेस्ट डेब्यू फिमेलकृति सेननहीरोपंती

बेस्ट परफॉर्मेन्स इन कॉमिक रोल
वरुण धवनमैं तेरा हीरो
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डसुभाष घईडायरेक्टर, प्रोड्यूसर
बेस्ट अॅक्ट्रेस फिमेल सपोर्टिंग
तब्बूहैदर
बेस्ट अॅक्टर मेल सपोर्टिंगरितेश देशमुखएक विलेन
बेस्ट अॅक्टर मेल
शाहिद कपूरहैदर
बेस्ट अॅक्टर फिमेलकंगना रनोटक्वीन
बेस्ट फिल्म
क्वीन
बेस्ट डायरेक्टरराजकुमार हिराणीपीके
वुमन ऑफ द ईयरदीपिका पदुकोणहॅप्पी न्यू ईयर, पीकू आणि फाइंडिंग फॅनी
बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर
अंकित तिवारीगाणे - तेरी गलियां
बेस्ट रीजनल फिल्मलय भारीमराठी
बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरकनिका कपूरगाणे - बेबी डॉल
बेस्ट म्युझिक डायरेक्टरशंकर-एहसान-लॉय2 स्टेट्स
बेस्ट स्टोरीविकास बहल, चैतल्य परमार, परवेज शेखक्वीन
बेस्ट डेब्यू डायरेक्शनसाजिद नाडियाडवाला आणि ओमंग कुमार(किक), (मेरी कॉम) विभागून
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आयफा सोहळ्यात क्लिक झालेली रितेश आणि जेनेलियाची खास छायाचित्रे...