आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 60 वर्षांच्या झाल्या रोहिणी हट्टंगडी, हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील आहे नावाजलेले नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी)

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 एप्रिल 1955 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. ओक हे त्यांचे माहेरचे आडनाव आहे. रोहिणी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनात दिल्लीच्या एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश घेतला. 1974 मध्ये त्यांनी एनएसडीत शिक्षण पूर्ण केले.
रोहिणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीवरुन केली. त्यांनी मुंबईत 'आविष्कार' या मराठी थिएटर ग्रुपची सुरुवात केली. या संस्थेने 150 हून नाटकांची निर्मिती केली आहे. या ग्रुपच्या ब-याच नाटकांमध्ये रोहिणी यांनी अभिनय केला.
1978 मध्ये 'अजीब दास्तां' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्या या सिनेमाला फिल्मफेअरचा क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला होता. 'अर्थ', 'सारांश', 'गांधी' या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. 'चक्र', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'मोहन जोशी हाजिर हो', 'चालबाज', 'अग्निपथ', 'दामिनी', 'मुन्ना भाई एमबीबीएस' या सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. रोहिणी यांना मेनस्ट्रीम सिनेमातील कॅरेक्टर रोलसाठी ओळखले जाते. त्यांनी 80 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
रोहिणी यांनी रंगभूमी आणि मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केले आहे. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेली 'चार दिवस सासूचे' ही मालिका बरेच वर्ष छोट्या पडद्यावर सुरु होती. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत आईआज्जींची भूमिका साकारत आहेत.
आज रोहिणी हट्टंगडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांनी पडद्यावर साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.