आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Romance Brewing Between Daily Soap Ka Re Durava\'s Jay And Aditi

Romance: जय-आदितीमधला संपला का दूरावा? जय सगळ्यांसमोर म्हणाला अदितीला ‘जहनसीब’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जय आणि आदिती नेहमी एकमेकांसमोर येतात, तेव्हा कोणाला काही कळू नये, म्हणून घाबरलेले आणि बावरलेलेच असतात. ‘का रे दुरावा’ मालिकेमध्ये त्यांच्यातला रोमँस कमी आणि दूरावाच जास्त पाहायला मिळालाय. पण झी मराठी अवॉर्ड्समध्ये चक्क दोघं सर्वांसमोर रोमँटिक झालेले दिसणार आहेत. ‘जहनसीब’ ह्या गाण्यावर दोघांनी रोमँटिक डान्स केलाय.
ह्या डान्सविषयी सुयश टिळकला विचारल्यावर तो म्हणृतो, “ मला पूर्वी डान्स करण्याचा एवढा कॉन्फिडन्स नव्हता. जो झीच्या स्टेज परफॉर्मन्समूळे आलाय. गेल्या एका वर्षात झीच्या चार वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी नाचलोय. गेल्यावर्षीचा झी अवॉर्डे, त्यानंतर आनंद गौरव, मग झीचित्रगौरव आणि आता पून्हा झीमराठी अवॉर्ड्स. त्यामूळे आता माझं फक्त अभिनयातच नाही, तर डान्समध्येही करीयर घडू शकतं. इतरांसारखा डान्समध्ये एक्सपर्ट झालो नसलो, तरीही आता नाचता येतं. त्यामूळेच कदाचित यंदा दोन दिवसांच्या रिहर्सलमध्ये डान्स चांगला पिक-अप केला.”
डान्स करून दमलेली सुरूची आदारकर घाम पुसत सांगतो होती, “ ह्या झीमराठी अवॉर्ड्समधल्या रोमँटिक परफॉर्मन्समूळे आमच्या चाहत्यांना जो रोमँस आम्ही मालिकेत दाखवू शकत नाही. तो पाहायला मिळणार आहे. गेल्यावर्षीही आम्ही झीमराठी अवॉर्ड्समध्ये नाचलो होतो. त्यामूळे थोडा अनुभव गाठीशी होताच. सुयशसोबत डान्सची केमिस्ट्रीही आता छान जुळून आलीय.”
सुरूची गेल्यावर्षीच्या आणि यंदाच्या आपल्या परफॉर्मन्सची तुलना करताना म्हणते, “ गेल्यावर्षी आम्ही एकिकडे मालिकेचे चित्रीकरण करायचो, तर दुसरीकडे रिहर्सल. खूप धावपळ झाली होती. यंदा मात्र मालिकेसाठी दोन दिवस अजिबात शुटिंग न करता पूर्णवेळ रिहर्सलसाठी दिला. आम्ही जेवढी आमच्यावर मेहनत करत होतो, त्यापेक्षाही जास्त मेहनत आमचा कोरीओग्राफर ओमकार शिंदेने आमच्यावर केलीय. त्यामूळे यंदा डान्स जास्त खुलून आलाय.”
(फोटो - प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जय आणि आदितीमधला रोमँस