आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नाली-बंटीचं झालं शुभमंगल, लग्नात विघ्न आणायला रूपालीने आणल्यात लाल मिरच्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नाली आणि बंटी मिश्राचं शुभमंगल होताना आता आपण ‘पुढचं पाऊल’मध्ये पाहणार आहोत. बंटीच्या अम्मासह सगळेच खूप खुशीत आहेत. आक्कासाहेबांनी थाटात त्यांचं लग्न लावलंय. पण दरवेळी शुभकार्यात विघ्न आणण्यासाठी रूपाली उत्सुक असतेच. तिने तसंही स्वप्नालीचं लग्न मोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आपण पाहिलाच आहे. मंगलकार्यातही रूपालीचं डोकं कारस्थान करण्यात व्यस्त असलेलं आपल्याला दिसेल.
रूपालीच्या कारस्थानाचा सुगावा नेहमी आक्कासाहेबांसोबतच कल्याणीला लागतोच. त्यामूळेच कल्याणीशीच ह्याविषयी संवाद साधल्यावर ती म्हणाली, , “रूपाताईला संगीतमध्ये तर आम्ही व्यस्त ठेवू शकलो होतो. पण स्वप्नालीचं लग्न ही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची होती. त्यामूळे आमचं लग्नाच्या दिवशी रूपालीपेक्षा जास्त लक्ष स्वप्नालीकडे आहे. खूप अवधीनंतर आता तिच्या आयुष्यात सुख येणार आहे. ह्यादिवसाची आम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो. तिला काय हवंय नको ते पाहत मी बहिणीसारखी तिच्या पाठीशी होते.त्यामूळे रूपाताईच्या कारस्थानांविषयी मला माहित नाही.”
नवी नवरी स्वप्नाली सूध्दा नटून सजून बसली होती. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला मालिकेत आता काय घडणार असं विचारल्यावर ती म्हणते, “ आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. एक तर ह्या मालिकेतल्या माझ्या भूमिकेचं आज लग्न आहे. खूप दिवसांनी स्वप्नालीच्या आयुष्यात चांगले आणि सुखाचे क्षण आलेत. दूसरी गोष्ट स्वप्नाली गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होती, ते तिचं लग्न होतं असल्याने मला तरी खूप दिवसांनी छान नटायला मिळतंय. त्यामूळे मस्त वाटतंय. पण मलाही स्वप्नालीसारखं थोड दु:ख आज झालंय. रूपालीने भलेही मला कितीही त्रास दिला, तरीही तिच्यासकट सगळ्यांनी मला आपलं मानलं होतं. आणि माहेराहून सासरी जाताना मुलीची जी अवस्था होते. तिच आता माझी झालीय. गेली अडीच वर्ष मी ह्या मालिकेच्या सेटवर रोज ह्या कलाकारांना भेटतेय. आता लग्न झाल्यानंतर मी ह्यांच्यासोबत कदाचित खूप कमी दिसेन. कारण मी आता इथे राहणार नाही. त्यामूळे मी खूप इमोशनल झाली आहे.”
स्वप्नालीलाही रूपालीच्या कारस्थानांचा विशेष सुगावा लागला नसल्याचंच दिसून आलं. म्हणून मालिकेतल्या अम्माशी ह्याविषयी चर्चा केली. त्या म्हणतात, “मला रूपालीच्या डोक्यात काय शिजतंय, ते काही माहित नाही. मी माझ्या मुला आणि सूनेसाठी खूप खूश आहे. पहिल्यांदा मला स्वप्नाली बिलकुल आवडली नव्हती. पण मी कोल्हापूरात आले. स्वप्नालीसोबत राहिले. तिचा चांगुलपणा मला दिसला. तिला माझ्यात आणि माझ्या मुलामध्ये ताटातूट करायची नसल्याचं दिसून आलं. तेव्हा आता मला स्वप्नाली पसंत पडलीय. आणि कोल्हापूरात मराठी पध्दतीनेच दोघांचं लग्न होतंय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आक्कासाहेब आणि रूपाली सांगतायत, लग्नात रूपाली आणणार कोणतं विघ्न