आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम-अर्पिताचं झालं शुभमंगल, आता आजी vs. अर्पिता की सून vs. कलेक्टर?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच नाट्यानंतर शेवटी कलेक्टर अर्पिताचं ओमशी शुभमंगल झालं. पण मालिकेतलं खरं नाट्य आत सुरू होणार आहे. अर्पिताला आता पदोपदी ओमच्या आजीला आपण चांगली सून असण्याची परीक्षा द्यायचीय. अशावेळी कलेक्टर अर्पिताची कर्तव्य, सून अर्पिताच्या जबाबदा-यांच्या आड आली तर मात्र आजी चांगलीच तिला धारेवर धरणार हे उघड आहे.
ह्याविषयी नवविवाहित अर्पिताशी संवाद साधल्यावर ती म्हणते, “खरं तर ओमच्या नोकरी करणा-या काकूने लग्नानंतर त्याच्या काकांना घरच्यांपासून तोडलं. आणि याचा धसका आजीने घेतला. पण सगळ्याचं नोकरी करणा-या मुली तशा नसतात, ह्याचा विश्वास देण्याची जबाबदारी अर्पितावर आहे. घराण्याच्या रिती-भाती सांभाळणं तिला गरजेचं आहे. कॉर्पोरेटर गिलबिलेने लग्नात येऊन घोळ घातल्यावर आता पून्हा पून्हा अशा गोष्टी होऊ नये, म्हणून अर्पिताला आता तारेवरची कसरत करायचीय.”
अर्पिता-ओमच्या साखरपुड्यावेळी आजीने दिलेली मोठी अंगठी अर्पिताने अगोदरच नाकराल्यामूळे आजीचा हिरमोड झाला होता. आता अर्पिता पून्हा कोणत्या दागिन्यांच्या बाबतीत असं करणार का असं विचारल्यावर अभिनेत्री नुपूर परूळेकर म्हणते, “साखरपुड्यावेळी अर्पिताने आजीने दिलेली मोठी अंगठी ह्यासाठी नाकारली होती, कारण तिला कलेक्टर म्हणून गोर-गरीबांमध्ये, आणि छोट्या वस्त्यांमध्येही वावरावं लागतं. अशावेळी मोठ-मोठे दागिने चांगले वाटत नाहीत. नंतर आजीलाही तो मुद्दा पटला होता. सध्या तरी मालिकेमध्ये माझ्यासाठी एक मंगळसूत्रच बनवण्यात आलंय. पून्हा असा कोणताही घराण्याचा दागिना मी रोज घालावा, अशी सध्यातरी आजीने इच्छा व्यक्त केली नाहीये. त्यामुळे सध्या तसं काही नाट्य झालं नाही.”
आजीला तिच्या नव्या सूनेविषयी विचारल्यावर, अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या, “नव्या सूनेच्या यशाचं, तिच्या तत्वनिष्ठ असण्याचं कौतुक आजीला आहेच. फक्त घर सांभाळताना, अर्पिताची नोकरी आड येऊ नये, एवढीच आजीची इच्छा आहे. आजीचीही काही तत्व आहेत. गतआयुष्यातल्या अनुभवानंतर तिची तत्व काही बाबतीत अधिक परखड झालीयत. त्यामुळे आजेसासू-नातसूनेमध्ये संघर्ष असेल. पण ही आजेसासू खाष्ट नसल्याने ती सूनेचा दूस्वास करणार नाही. पण सण-वार, पाहूणे-राहूणे अर्पिताने सांभाळण्याचं बंधन तिच्यावर असेलच.”
मालिकतेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, ह्याविषयी त्या पूढे सांगतात, “ही मालिका सुरू झाल्यानंतर मला कधी कधी काही सासवा अगदी भेटायला येतात. तेव्हा आजी किती बरोबर आहे, ते सांगतात. आणि मालिकेत तुम्ही यापूढेही असंच वागा, असाही सल्ला देतात.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ओम-अर्पिताच्या लग्नाचे फोटो
बातम्या आणखी आहेत...