आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा...\'च्या सेटवर सचिन खेडेकरांना मिळाला ‘शॉक’स्पर्श, ही भानगड आहे तरी काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर अभिनेते सचिन खेडेकर आणि अॅक्ट सादर करताना कलाकार)
‘चला हवा येऊ द्या’च्या सोमवारच्या भागात आपण सचिन खेडेकर, मिलींद सोमण, देविका दफ्तरदार, शाहिर संभाजी भगत आणि दिग्दर्शक जयप्रद देसाई यांना पाहणार आहोत. या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘नागरिक’ चित्रपटाच्या या सगळ्या कलाकारांची निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशाल बद्रिके, आणि सागर कारंडे सोबतची जुगलबंदी आपल्याला पाहता येणार आहे,
खास करून या एपिसोडमध्ये आपण सचिन खेडेकर आणि मिलींद सोमण यांची अनेक गुपिते ऐकणार आहोत. त्याचप्रमाणे यातला सगळ्यात महत्वाचा अॅक्ट आहे, सचिन खेडेकरांच्या ‘काकस्पर्श’ सिनेमावर केलेला, ‘शॉकस्पर्श’ अॅक्ट. खरं तर संपूर्ण सिनेमाचं यात विडंबन केलं गेलं आहे, पण सचिन खेडेकर यांनी हे विडंबन सगळ्यात जास्त एन्जॉय केलं.
याबद्दल divyamarathi.com शी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “ खरं तर मी नेहमी हा कार्यक्रम पाहतो, पण या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच आलो. आणि त्यांनी ‘शॉकस्पर्श’ नांवाचं केलेलं विडंबन पाहून मी अक्षरश: पोटभरून हसलो. ‘काकस्पर्श’चं कधी विडंबन होऊ शकेल, असं वाटलं ही नव्हतं. पण ते पाहताना मी खूप एन्जॉय केलं.”
नेहमी गंभीर विषयावरच्या सिनेमाशी निगडीत असणा-या आणि संवेदनशील भूमिकेत दिसणा-या सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिमत्वाची विनोदी बाजूही दिसून आली आहे. त्याबद्दल सांगताना सचिन म्हणतात,” मला कॉमेडी एक्ट करायला खूप आवडते. पण मला कोणी तशा भूमिका ऑफरच करत नाही.”
मिलींद सोमण यांचा तर रिएलिटी शोचा पहिलाच अनुभव. त्यांनी हिंदी, इंग्रजी किंवा मराठीत कधीच रिएलिटी शोमध्ये भाग घेतला नव्हता. मिलींद आपल्या अनुभवाबद्दल सांगतात, ''मी ‘चला हवा येऊ द्या’च्या सर्वच कलाकारांना पहिल्यांदाच भेटलो. भारत गणेशपूरेने एक खास अॅक्ट यात सादर केलाय आणि जेव्हा भारत तो अॅक्ट करत होता. तेव्हा मी विचार करत होतो. प्रत्यक्षात भारत कसं बोलतं असेल. 'चला हवा येऊ द्या' मधला अभिनेता भारत आणि त्याचं व्यक्तिमत्व किती वेगळं असू शकेल. तो ही एनर्जी कुठून आणतं असेल. मला खूप काही शिकायला मिळालं.”
डॉक्टर निलेश साबळे ने ‘शॉकस्पर्श’ हे विडंबन नाट्य लिहिलंय, ”गंभीर चित्रपटावर जेव्हा विडंबन नाट्य लिहीलं जातं, तेव्हा ते अधिक भावतं. ते नीट जमलं तर मग कलाकारही खुश होतात. आणि ते सर्वांना आवडलं. आणि त्यांचा आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसत होता.”
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कलाकारांनी सादर केलेल्या अॅक्टची खास झलक...
(सर्व फोटो – अजित रेडेकर)