आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान,आमिर,शाहरूख, अजयच्या पाठोपाठ, कोणता मराठी अभिनेता करतोय साऊथ फिल्मचा रिमेक? जाणून घ्या.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान, आमिर, शाहरूख, अजय यांनी केले साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम
साऊथ चित्रपटांचा रिमेक करण्याचा मोह फक्त बॉलीवूड स्टार्सनाच नाही तर मराठी स्टार्सनाही होतो, याचच उदाहरण आहेत, अभिनेते सचिन खेडेकर. आमिर खानने जसा 'गजनी'चा रिमेक केला. सलमान खानने जसा 'बॉडीगार्ड', 'वॉन्टेड' आणि 'रेडी'चा रिमेक केला. शाहरूख खानने जसा 'बिल्लू'चा रिमेक केला. आणि अजय देवगणने जसा 'सिंघम'चा रिमेक केला. अगदी तशाच साऊथ इंडियन चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला अभिनेते सचिन खेडेकर दिसणार आहेत. आणि या मराठी चित्रपटाचे नाव आहे, ‘शटर’.
मूळ मल्याळम चित्रपटाच्या मराठी रिमेकविषयी सचिन खेडेकर यांना विचारताच, ते हसून म्हणतात,” मी नेहमी वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे पाहतो. आणि मला इतर भाषांमधले बरेच चित्रपट आवडतात. आणि ह्यात आपण काम करावं. अशी एक कलावंत म्हणून इच्छा असते. अगं, मला तर ‘दृश्यम’चा रिमेक करायचा होता. पण तो आता अजय देवगण करतोय. मग मी ‘शटर’च्या रिमेकमध्ये काम केले, शटर हा सिनेमा थ्रिलर आहे. आणि मूळ मल्याळम चित्रपट मी पाहिला आणि मला तो आवडला. मग विचार केला. अरे, अशा सिनेमात काम करायलाच हवं. एक तर, आजकाल मी चित्रपटांच्या बाबतीत खूप सिलेक्टिव्ह झालो आहे, इतके वर्ष काम केल्यावर उगीच जो येईल तो सिनेमा आता मी करत नाही. जो खूप आवडतो. तोच स्विकारतो.”
ह्या सिनेमाची कथाच फक्त दाक्षिणात्य नाही तर दिग्दर्शकही दाक्षिणात्य आहे. त्याविषयी विचारल्यावर सचिन सांगतात,” साऊथचे दिग्दर्शक व्ही.के.प्रकाश हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यांच्यासोबत मी एका इंग्रजी आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. त्यांना मराठी सिनेमा दिग्दर्शित करण्याची इच्छा होती. आणि माझ्याप्रमाणे त्यांनाही असं वाटतं होतं की, ह्या मल्याळम सिनेमाचा मराठी रिमेक होऊ शकतो. मला ह्यातली भूमिका आणि यातल्या कथानकातली गुढता खूप आवडली होतीच. आणि ह्यावर्षी 'नागरिक' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मी केला आणि आता हा सूध्दा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे.“
चित्रपटातल्या आपल्या भूमिकेविषयी ते बोलतात,की,”माझं या सिनेमातलं पात्र हे एका कुटूंबवत्सल माणसाचे आहे. पण ह्या कुटूंबवत्सल माणसाची सत्त्वपरीक्षा तेव्हा लागते, जेव्हा तो एका कचाट्यात सापडतो. जसं चित्रपटाच्या टॅगलाइनमध्ये म्हटलंय की, एक चुकीचा निर्णय तुमचे अख्खे आयुष्य बदलवून टाकते. तसेच काहीसे ह्या माणसाच्या बाबतीत घडते. तो एका वेश्येसोबत एका शटरच्या आत सापडलाय. आणि ह्या शटरच्या आत एक सिनेमा घडतोय. आणि बाहेर एक सिनेमा घडतोय. एक दिवस आणि एक रात्रीत घडलेली ही कथा आहे.”
‘शटर’ हा चित्रपट ३ जुलैला रिलीज होतोय .
पूढील स्लाइडमध्ये पाहा, सचिन खेडेकर यांच्या 'शटर' चित्रपटाचे फोटो