आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असेल सिद्धार्थ-सोनालीचा 'गुलाबजाम', पोस्टरमध्ये पाहायला मिळाला Bold Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलाबजाम चित्रपटाचे पोस्टर. - Divya Marathi
गुलाबजाम चित्रपटाचे पोस्टर.
एंटरटेनमेंट डेस्क - आगळ्या वेगळ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे सचिन कुंडलकर त्यांच्या आगामी गुलाबजाम या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झालेत. 'वजनदार'च्या यशानंतर कुंडलकर यांच्या या नव्या सिनेमाचे नाव आहे, 'गुलाबजाम'. कुंडलकर यांनी स्वतः सोशल मीडियावर याचित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज केले आहे. तसेच चित्रपटाची कथा नेमकी काय असणार हेही त्यांनी सांगितले आहे. चित्रपटाचे लंडनमधील शुटिंग पूर्ण झाल्याचे कुंडलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 
अशी असेल कथा 
'गुलाबजाम' ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी रेसिपीज शिकण्यासाठी भारतात येतो. याठिकाणी तो राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती म्हणजेच रेसिपीज शिकवण्याचा निर्णय घेते. ही त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रिची सुरुवात असते. पण मैत्रिचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कसी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट आहे, असे कुंडलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. 

बोल्ड पोस्टर 
कथेतील नावीण्य हे कुंडलकर यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य असते. पण यावेळी त्यांच्या चित्रपटाची चर्चा आणखी एका गोष्टीसाठी होणार आहे. ती म्हणजे त्यांनी रिलीज केलेले चित्रपटाचे पोस्टर. मराठी चित्रपटांशी तुलना करता हे पोस्टर काहीसे बोल्ड दिसत आहे. अशा प्रकारचे बोल्ड पोस्टर मराठीत यापूर्वी फारसे पाहायला मिळालेले नाहीत. 

सिद्धार्थ-सोनालीची केमिस्ट्री 
या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांची आगळीवेगळी अशी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटानंतर सोनालीची भूमिका लक्षात राहावी असे काम तिच्या चाहत्यांना पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आकर्षण असेल. तर सिद्धार्थ चांदेकरबरोबर तिची केमिस्ट्री कशी असणार हे पाहण्याचीही सर्वांमध्येच उत्सुकता असणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटातील कलाकारांचे लंडनमधील शुटिंगदरम्यानचे काही PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...