आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात सचिन पिळगांवकर यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा -  गोव्यातील विन्सन वर्ल्ड आयोजित १० व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवानिमित्त ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. १६ ते १८ जून दरम्यान आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनाला 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांचा कार्यक्रम खास आकर्षण ठरणार आहे. 
 
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल. एकूण १८ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जातील. अभिनेते सचिन पिळगांवकर, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, परेश मोकाशी, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे यांची खास उपस्थिती या महोत्सवाला लाभणार आहे. 
 
यंदा पहिल्यांदाच या महोत्सवानिमित्त बायर्स अॅण्ड सेलर्स मार्केट भरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार वितरक या मार्केटमध्ये सहभागी होतील. चित्रपट कलाकार, निर्माते यांच्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...