मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी वयाच्या 61 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 17 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि यानिमित्ताने मुंबईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह राजकारण, क्रिडा आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सचिन यांनी 'अशी ही आशिकी' या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला, ''सचिन यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो आहे. ते आज वयाच्या साठाव्या वर्षी देखील प्रचंड फिट आहेत. मी देखील माझ्या साठीत सचिन यांच्या इतकाच फिट आणि उत्साही राहाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.'' तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज हे माझे बालमित्र आहेत असे सचिन यांनी म्हणताच राज यांनी त्यांची टर खेचली. वयामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर थोडासा परिणाम झाला आहे असे म्हणत त्यांनी पार्टीला हशा पिकवला.
पाहुयात, सचिन यांच्या बर्थडे बॅशचे काही नवीन फोटोज...
हेही वाचा... सचिन पिळगांवकर स्पेशल