(सदाशिव अमरापूरकर यांच्या अंत्यसंस्काराचे छायाचित्र)
अहमदनगरः प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर आज (4 नोव्हेंबर) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरापूरकर यांच्या मुळगावी म्हणजे अहमदनगर येथे ते अनंतात विलीन झाले. नातेवाई आणि गावक-यांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येत लोक सहभागी झाले होते.
अमरापूकर यांचे सोमवारी (3 नोव्हेंबर) मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली सायली जहागिरदार, केतकी जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सदाशिव अमरापूरकर यांच्या अंत्ययात्रेची छायाचित्रे...