(सदाशिव अमरापूरकर यांचे अंत्यदर्शन घेताना मान्यवर)
मुंबईः ज्येष्ठ नाटय-सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी रात्री पावणे तीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली सायली जहागिरदार, केतकी जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत. मुंबईच्या भाईदास हॉलमध्ये आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
मुंबईत अनेक मान्यवरांनी भाईदास हॉलमध्ये पोहोचून सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अभिनेत्री निवेदिता सराफ, रजा मुराद, रमेश भाटकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, जयवंत वाडकर, किशोरी शहाणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली.
उद्या संध्याकाळी चार वाजता अमरापूरकर यांच्या मुळगावी म्हणजे अहमदनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव आज मुंबईहून अहमदनगरमध्ये नेण्यात आले आहे.
पुढे पाहा, मुंबईत अमरापूरकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या मान्यवरांची छायाचित्रे...