आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या सागरिकाचे वडील नाहीत हे अॅक्टर, राजघराण्याशी आहे संबंध, एका अपघाताने बदलले आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरीका घाटगेने या चित्रपटानंतर फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जीले, इरादा अशा बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम केले. 'दिलदरिया' हा सागरिकाचा पहिला पंजाबी सिनेमा. या सिनेमासाठी सागरिकाने पंजाबी भाषेचेही धडे गिरवले.
 
हिंदी आणि पंजाबी भाषिक सिनेमांसोबतच सागरिकाने मराठीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. 2013 मध्ये सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये सागरिका झळकली होती. या चित्रपटानंतर 'डाव' हा सागरिकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे. हे झाले सागरिकाच्या करिअरविषयी. तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे ती कोल्हापुरच्या एका राजघराण्यातून असून लवकरच क्रिकेटपटू झहीर खानसोबत विवाहबद्ध होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच झहीर खानसोबत सागरिकाचा साखरपुडा झाला. 

चुकीचे वृत्त... 
याचवर्षी एप्रिल महिन्यात सागरिका प्रसिद्ध अभिनेते विजयेंद्र घाटगे यांची कन्या असल्याची बातमी अनेक ठिकाणी प्रकाशित झाली होती. पण एका मुलाखतीत सागरिकाने विजयेंद्र घाटगे तिचे वडील नसल्याचे स्पष्ट केले. 

विजयेंद्र घाटगे वडील नसून आहेत काका..  
विजयेंद्र घाटगे हे सागरिका घाटगेचे वडील नसून काका आहे. एका मुलाखतीत सागरिका म्हणाली, "अनेक ठिकाणी चुकीने विजयेंद्र घाटगेंचा उल्लेख माझे वडील म्हणून झाला आहे. माझ्या वडिलांचे नाव विजयसिंग घाटगे आहे. आम्ही राजघराण्यातून आहे, हे खरे आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे आम्ही वंशज आहोत. विजयेंद्र घाटगे हे माझे काका असून त्यांच्या मातोश्री होळकर घराण्यातील आहेत."

कुठे आहेत विजयेंद्र घाटगे? 
काका विजयेंद्र घाटगे यांच्या पावलावर पाऊल टाकत सागरिकाने फिल्मी दुनियेत पदार्पण केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केले. 'देवदास' या चित्रपटात ऐश्वर्याच्या पतीची भूमिका साकारणा-या विजयेंद्र यांनी 'चितचोर', 'प्रेमरोग', 'कसमें वादे', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. हॅण्डसम विजयेंद्र घाटगे यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवला आहे. पण ज्या काकांचा अभिनयाचा वारसा सागरिका पुढे नेत आहे, ते विजयेंद्र घाटगे आता कुठे आहे, हे कुणालाच ठाऊक नाहीये. 

चला तर मग जाणून घेऊयात, मराठमोळ्या विजयेंद्र घाटगे यांच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही...                
बातम्या आणखी आहेत...