आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sagarika Music Launches Shashank Ketkar As A Singer

प्रेक्षकांचा लाडका 'श्री' बनला गायक, 'यारा…' गाण्याला चढवला स्वरसाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शशांक केतकर)
झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री अर्थात शशांक केतकर गायक बनला आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण ही कोणती ही अफवा नसून 'सागरिका म्युझिक'च्या 'यारा…' या नवीन रोमॅंटिक ड्यूएट गाण्यासाठी शशांक केतकर आणि गायिका दीपिका जोग यांनी पार्श्वगायन केले असून या गाण्याचा व्हिडीओ सुद्धा त्याच्यावरच चित्रित करण्यात आला आहे.
मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक नवोदित गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असलेल्या सागरिका म्युझिकच्या सागरिका बाम या नेहमीच नवीन टॅलेंटच्या शोधात असतात.
दीपिका ही केवळ टॅलेंटड नसून ती व्हर्सटाईल आहे. तिचं 'यारा…' हे सॉफ्ट रोमॅंटिक गाणं मी रिलीज करण्याचे तसेच त्याचा उत्तम व्हिडीओ तयार करण्याचे मी ठरविले. शशांक हा खरंच खूप गुणी अभिनेता आहे. आपल्या संतुलित अभिनयातून शशांकने अपेक्षेपेक्षा अधिकच चांगले काम केले असल्याचे सागरिका बाम यांनी आवर्जून सांगितले.
पुढे वाचा, आपल्या पहिल्या अल्बमविषयी काय म्हणतोय शशांक...