आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झहीरसोबतच्या लग्नावर म्हटली सागरिका, उत्सुक्ता आणि तणाव दोन्हीही आहे मनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रकन्या सागरीका घाटगे लवकरच तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटर झहीर खानसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नाच्या तयारीबद्दल सांगताना सागरीका म्हणते की, लग्नाचे प्लानिंग करणे जितके मजेशीर वाटते तितकेच स्ट्रेसफुलही असते. सागरिका एका फुटविअर ब्रँडच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती त्यावेळी मीडियाशी बोलताना तिने तिच्या लग्नाच्या सर्व तयारीची माहिती दिली. 
 
सागरिका 'चक दे इंडिया' मध्ये निभावलेल्या भूमिकेने प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटात तिने एका क्रिकेटरला डेट केले होते आणि खऱ्या आयुष्यातही ती क्रिकेटरसोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा केला आहे. 
 
27 एप्रिलला सागरीका आणि झहीर यांनी साखरपुडा केला होता. झहीरने स्वतः सांगितले आहे की त्याच्या लग्नाचे रिसेप्शन 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याबद्दल विचारले तेव्हा सागरीकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सागरीका म्हणते, मी चक दे इंडियामध्ये एका क्रिकेटरला डेट केले होते पण त्याच्याशी लग्न केले नाही. खऱ्या आयुष्यातही मी क्रिकेटरला डेट केले आणि त्यासोबत लग्न करत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, झहीर-सागरीकाचे एकमेकांसोबतचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...