आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sai And Sharad Kelkar First Time Doing Film Together, Sharad To Play \'Rakshas\'?

सई ताम्हणकर आणि शरद केळकर पहिल्यांदाच दिसणार फिल्ममध्ये एकत्र, शरद बनणार ‘राक्षस’?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलेश नवलखा आणि विवेक कजारिया निर्मित ‘राक्षस’ चित्रपटात सई ताम्हणकर, शरद केळकर, विजय मौर्य आणि उमेश जगताप आहेत. नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर निलेख नवलखा ह्यांनी सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यामातून रिलीज केले.
नेहमी नव्या लेखक-दिग्दर्शकांसोबत काम करायला पसंती देणा-या नवलखा आर्ट्स आणि होली बेसील प्रॉडक्शनने ह्यावेळी सूध्दा ज्ञानेश झोटिंग ह्या नवोदित लेखक-दिग्दर्शकाच्याच ‘राक्षस’ फिल्मची निर्मिती करण्याचं ठरवलं. आणि ज्ञानेशने लिहीलेली संहित उत्कृष्ठ असल्याची पावतीही फिल्म सुरू करण्याच्या अगोदर दृश्यम सॅन्डॅन्स फिल्म लॅबने दिली. ह्या स्क्रिनप्लेरायटर्सच्या लॅबने ज्ञानेशची ही फिल्म नुकतीच सिलेक्ट करून नावाजल्यावर आता फिल्मच्या चित्रीकरणाला सुरूवात झालीय
निर्माते विवेक कजारिया ह्याविषयी सांगतात, “ज्ञानेशने लिहीलेली ही फिल्म एक कौटूंबिक थरारपट आहे. थोडासा सस्पेन्स, तर थोडासा इमोशनल असा हा चित्रपट असेल. आम्हांला नेहमीच नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं. कारण नवोदित दिग्दर्शकच तुम्हांला खरी मनाला भिडणारी, निरागस कथा सांगू शकतात. ती त्यांच्या आयुष्याशी, मनाशी खूप जवळची असल्याने ते खूप पॅशनेटली काम करतात. म्हणूनच तर ‘शाळा’चा सुजय डहाके, ‘फॅन्ड्री’चा नागराज मंजुळे, ‘सिध्दान्त’चा विवेक वाघ, ‘चौर्य’चा समीर पाटील अशा दिग्दर्शकांसोबत काम केल्यावर आता आम्ही ज्ञानेश झोटिंगसोबत काम करतोय. तो आमचा सातवा नवोदित दिग्दर्शक आहे.”
चित्रपटाविषयी सांगताना ते पूढे म्हणतात, “यात सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेसारखी किंवा फिल्मसारखी ही तिची फिल्म नाही. आणि असा इमोशनल आणि परफॉर्मन्स ओरिएन्टेड रोलही तिने ह्याअगोदर कधी केलेला नाहीये, याचा मी दावा करतो. ही भूमिका तिच्यासाठी चॅलेंजिग आहे. तिच्या करीयरमधली ही नक्कीच माइलस्टोन फिल्म असेल.”
शरद केळकरने ‘लय भारी’ फिल्ममध्ये खलनायकाची भूमिका केली होती. आता ह्याही सिनेमात तो खलनायक म्हणजेच राक्षस असेल का? असं विचारल्यावर विवेक म्हणतात, “हे मात्र मी तुम्हांला सांगितलं, तर अख्खी फिल्मच रिव्हील होईल. त्यामूळे ह्याविषयी मी काही बोलू शकत नाही. पण हे मात्र खरं की, शेवटी प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण असल्याने ही फिल्म पाहिल्यावर एखाद्याला तो खलनायक वाटू शकेल, आणि एखाद्याला नायकही.”
सईने नुकतंच सचिन कुंडाळकरच्या एका फिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ह्या चित्रपटासाठी सईला काही प्रमाणात वजनही वाढवावे लागले होते. ह्याचा परिणाम ‘राक्षस’वर होईल का, असं विचारल्यावर विवेक म्हणतात, “सई चित्रपटाच्या सेटवर आली तेव्हा ती जाडजाडू वाटत नव्हती. दूसरी गोष्ट म्हणजे ती ह्यात जाड जरी दिसली तरीही काही फरक पडणार नाही, अशी तिची भूमिका आहे. तिचा ह्यातला अपिअरन्स खूप वेगळा आहे. तिच्या ह्या फिल्ममधल्या परफॉर्मन्समूळे तिच्या चाहत्यांचे लक्ष तिच्या वजनाकडे आजिबात जाणार नाही, ह्याचा मला विश्वास आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शरद केळकर आणि सई ताम्हणकरचे फोटो