आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: माझ्या कपड्यांना लक्ष्मण रेषा लावण्यापेक्षा तुमच्या डोळ्यातला रावण का नाही मारत तुम्ही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठी वाहिनीवर अलीकडेच उंच माझा झोका हा पुरस्कार सोहळा पार पडला. सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन ‘उंच माझा झोका पुरस्कार’ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. 'स्व' पलीकडल्या जगाचा ध्यास घेतलेल्या, असामान्य 'ती' चा सन्मान करणा-या या सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकरच्या सादरीकरणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांना सईने तिच्या अदाकारीने चारचाँद लावले.

''उपेक्षेची लांबच्या लांब कोरणं ओलांडायला क्षतकं लागली. बोच-या नजरांचे बाभुळ काटे त्याचीच शेवटची वाहन झाली. तुम्ही माझ्या ज्या रात्री जाळल्या तिथल्याच चांदण्यांची राख घेतली मी आणि रोज वाढणा-या भिंतींवरुन परडीत स्वातंत्र्याची फुलं वेचली. माझ्या यातनांच हे सततचं गाणं आता मी मलाही सांगणार नाही. तुम्ही शर्यत संपली म्हणा खुशाल पण आता मी थांबणार नाही... माझ्या कपड्यांना लक्ष्मण रेषा लावण्यापेक्षा तुमच्या डोळ्यातला रावण का नाही मारत तुम्ही...'' या भावना या सादरीकरणातून व्यक्त करण्यात आल्या. झी मराठीच्या फेसबुक पेजवर सईच्या सादरीकरणाच्या या व्हिडिओला पाच लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. 

पाहुयात, या सादरीकरणातील सईची खास झलक आणि शेवटच्या स्लाईड्सवर बघा सादरीकरणाचा पूर्ण व्हिडिओ...   
बातम्या आणखी आहेत...