आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ज्या मुली बारीक नसतात त्या जाडच असतात...' बघा सई-प्रियाचा 'वजनदार' Trailer+Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'वजनदार' या सिनेमाची सध्या चर्चा चांगलीच रंगतेय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमाचा 'वजनदार' ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर आणि प्रिया बापट नेहमीच्या लूकपेक्षा वेगळ्या अर्थातच जाड दिसत आहेत. या सिनेमासाठी प्रियाने तब्बल 16 तर सईने 10 किलो वजन वाढवले आहे. ट्रेलरमध्ये त्यांचा वजनदार लूक लक्ष वेधून घेतोय. हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या सिनेमात glamorous सई ताम्हणकर आणि प्रिया बापटसोबत चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर एका महत्वाच्या भूमिकेत आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सुपुत्र चिराग पाटील या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. सचिन कुंडलकर यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे व दिग्दर्शन केलं आहे.

‘सांगतो ऐका… !’ या सिनेमाच्या निर्मितीनंतर ‘लॅन्डमार्क फिल्मस’ च्या विधि कासलीवाल आता पुन्हा एकदा नवा विषय घेऊन येत आहेत. विधि कासलीवालयांना सिनेसृष्टीची मोठी पार्श्वभूमी आहे. बडजात्या कुटुंबाशी त्या संबंधित आहेत. राजश्री फिल्म्सच्या ‘विवाह’या सिनेमासाठी त्या सहायक दिग्दर्शक होत्या. तसंच ‘इसी लाईफ में’ या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. वेगळ्या विषयांच्या शोधात त्यांनी ‘सांगतो ऐका….!’ ह्या धमाल सिनेमाची निर्मिती केली होती. आता ‘वजनदार’ माणसांची ‘वजनदार’ गोष्ट त्या सादर करत आहेत. गेलं वर्षभर ‘वजनदार’ हा सिनेमा चर्चेत आहे. सोशल मीडियातही त्याविषयी उत्सुकता आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, 'वजनदार' सिनेमाच्या ट्रेलरमधील सई आणि प्रियाच्या लूकची खास झलक छायाचित्रांमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...