आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 29 वर्षांची झाली बोल्ड आणि बिनधास्त सई, पाहा तिच्या 29 खास अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 25 जून 1986 रोजी सांगलीत तिचा जन्म झाला. अल्पावधीतच सईने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ‘पुणे ५२’, ‘बीपी’, ‘अनुमती’, ‘सौ. शशी देवधर’, ‘दुनियादारी’, 'हंटर' यांसारख्या सिनमांतून चमक दाखवणारी सई मराठी अभिनेत्रीचे ख-या अर्थाने आधुनिक रूप आहे.
'नो एन्ट्री पुढे धोका आहे' या सिनेमात बिकिनी परिधान करुन स्वतःची बोल्ड आणि बिनधास्त इमेज तयार केली. ती आज मराठी इंडस्ट्रीतली ती एक टॉपची अभिनेत्री बनली आहे. मोठ्या पडद्यावर सई कधी बोल्ड, कधी सेक्सी तर कधी साध्या रूपात दिसली. तिचे प्रत्येक रुप तिच्या चाहत्यांना भूरळ घालणारा ठरला आहे.
आज सईच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून तिचा चाहत्यांना घायाळ करणारा अंदाज दाखवत आहोत...