आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिकिनी गर्ल' नावाने प्रसिद्ध आहे ही मराठमोळी अॅक्ट्रेस, जाणून घ्या का केले वेट गेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरः अभिनेत्री सई ताम्हणकरचे दोन सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. 'जाऊद्याना बाळासाहेब' आणि 'फॅमिली कट्टा' या सिनेमांमुळे ती चर्चेत आहे. यासोबतच तिने आगामी वजनदार हे शीर्षक असलेल्या मराठी सिनेमाच्या शूटिंगलासुद्धा सुरुवात केली आहे. वजनदारमध्ये सईसोबत मराठीची आणखी एक ग्लॅमरस अॅक्ट्रेस अर्थातच प्रिया बापट मेन लीडमध्ये असणारेय. सिनेमासाठी सईने वाढवले 10 किलो वजन...
- अलीकडेच सई आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ऑरेंज सिटी नागपूरमध्ये आली होती. यावेळी तिने आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट्ससोबतच ब-याच गोष्टींवर गप्पा मारल्या.
- तिच्या मते, मराठी इंडस्ट्रीत आमुलाग्र बदल घडला आहे. येथे असे सिनेमे तयार होत आहेत, जे तरुणांना विशेष पसंत पडत आहेत.
- आगामी 'वजनदार' हा सिनेमा सचिन कुंडलकर दिग्दर्शित करत असून सईसोबत प्रिया बापट, समीर धर्माधिकारी, क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील मुख्य भूमिकेत असतील.
- जेव्हा सचिन कुंडलकर यांनी सई आणि प्रियाच्या नावाचा विचार या सिनेमासाठी केला, तेव्हा ते या दोघी होकार देतील का याविषयी साशंक होते.
- याचे कारण म्हणजे या सिनेमातील भूमिकांसाठी दोघींनाही वजन वाढवायचे होते. सईने वजन वाढवायला होकार दिला, मात्र प्रिया सचिन तिची गंमत करताहेत असे वाटले होते. पण दोघीही वजन वाढवायला तयार झाल्या.
- या सिनेमासाठी प्रियाने तब्बल 16 तर सईने 10 किलो वजन वाढवले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सईचा दिलखेचक लूक आणि सोबतच वाचा 'वजनदार' या फिल्मविषयी आणि सईविषयी बरंच काही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...