आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईला मिळाले टॉलिवूडचे तिकिट, मल्याळम-तामिळ \'सोलो\'मध्ये झळकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता सई दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पणासाठीसुद्धा सज्ज झाली आहे. अर्थातच प्रेक्षकांच्या लाडक्या सईला आता टॉलिवूडचे तिकिट मिळाले आहे. बोल्ड आणि ब्युटीफुल सई लवकरच ‘सोलो’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित ‘सोलो’ हा चित्रपट तामिळ आणि मल्याळम भाषेत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात सती असं सईच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
 
'सोलो' हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजॉय नाम्बियार यांनी केले आहे. अमिताभ बच्चन आणि फरहान खान स्टारर 'वझीर' हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. 'सोलो' या चित्रपटाची कहाणी निवडक वेचककथा असून चार वेगवेगळ्या व्यक्तींची असून चार मूलघटकांवर, म्हणजे पृथ्वी/रुद्र, अग्नी, वायू आणि जल यांवर, केंद्रित आहे आणि ती नंतर एकत्रितपणे बांधली जाते. 

दुलकुर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा, श्रुती हरिहरन, गोविंद मेनन हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण कोचिन तर काही चित्रीकरण मुंबईत आणि लोणावळ्यात झाले आहे. 

'सोलो' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करून सईनेच तिच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. सोलो या चित्रपटात मी महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे सईने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. या चित्रपटाचा टीझरसुद्धा प्रदर्शित झाला असून त्यामध्ये सई ताम्हणकर दिसतेय.  
 
चला तर मग पाहुयात, सईच्या पहिल्यावहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा ट्रेलर आणि सईने शेअर केलेल्या पोस्ट...
बातम्या आणखी आहेत...