(फेमिनाच्या कव्हरपेजवर अभिनेत्री सई ताम्हणकर)
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर प्रसिद्ध अशा फेमिना मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. फेमिनातर्फे नुकतेच सईला 'द मोस्ट पॉवरफूल वूमन ऑफ दि इअर अॅवॉर्ड'ने गौरविण्यात आले होते. आता तर सईला थेट फेमिनाच्या कव्हर पेजवर स्थान मिळाले आहे. मॅगझिनच्या जून महिन्याच्या अंकावर सईचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळतोय.
विशेष म्हणजे फेमिनाच्या कव्हर पेजवर सई दुसऱ्यांदा झळकतेय. बॉलिवूडच्याच अभिनेत्रींचा दबदबा असलेल्या फेमिनाने आता सईची दखल घेतलीय. गेल्या 5 वर्षांमध्ये सई ताम्हणकरनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एकुणच सईच्या शिरपेचात पुन्हा एकदा हा मानाचा तुरा खोवला गेल्याने नक्कीच तिचे चाहते आनंदीत असतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फेमिनासाठी फोटोशूट करतानाची सईची छायाचित्रे...