आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तेव्हा तू taxi चालवायचास मुंबईत...\' सईने बाबांना लिहिले पत्र, पत्रातून घातली भावनिक साद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त इमेजसाठी ओळखली जाते. पण पडद्यावर बोल्ड आणि बिनधास्त दिसणारी सई खऱ्या आयुष्यात तितकीच इमोशनल देखील आहे. 7 ऑक्टोबरला तिची प्रमुख भूमिका असलेला ‘फॅमिली कट्टा’ हा कुटुंब आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात वडील आणि मुलीचे नाते रंगवत असताना सईची खऱ्या आयुष्यातील तिच्या बाबांसाठी असलेली भावनिक ओढ दिसून येते. स्वतःच्या बाबांशी हे इमोशन्स शेअर करण्यासाठी सईने तिच्या बाबांना एक पत्र लिहिले आणि बेफिकीर व बिनधास्त असलेली सई तिच्या बाबांबद्दल किती इमोशनल आहे हे तिने लिहिलेल्या पत्रातून सहज कळून येते. वडील हयात असताना त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्याची खंत या पत्रातून स्पष्ट दिसून येते.

सईचे वडील आता हयात नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतसुद्धा वडिलांच्या मृत्यूशी सबंधित असलेली आठवण सांगताना सईला रडू अनावर झाले होते. एका दिवाळीत सईचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून निघून गेले. नंतर दोन ते तीन वर्षांत त्यांची पोस्टमार्टम झालेली बॉडी तिला बघावी लागली होती. या दोन तीन वर्षांत तिचा तिच्या वडिलांशी काहीच संपर्क नव्हता.

फॅमिली कट्टा या सिनेमाच्या निमित्ताने सईच्या आयुष्यात दडलेले हे दुःख पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर उघड झाले आहे.
सईने तिच्या वडिलांना पत्रातून काय लिहिले, वाचा तिचे पत्र जसेच्या तसे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...