आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईचा बिनधास्त अंदाज... परदेशात घेतला स्काय डायव्हिंगचा चित्तथरारक अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्काय डायविंगचा चित्तथरारक अनुभव घेताना सई - Divya Marathi
स्काय डायविंगचा चित्तथरारक अनुभव घेताना सई

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई सतत नाविन्याच्या शोधात असते. मग ती एखादी भूमिकां असो किंवा ड्रेसिंग स्टाइल.... सतत काहीतरी नवीन करण्याचा तिचा प्रयत्न असतो. आता हेच बघा ना, सई काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड शोच्या निमित्ताने सिडनी (ऑस्ट्रेलिया) मध्ये गेली होती. येथे तिने जे धाडस दाखवलं हे बघून कुणीही अवाक् होईल.

सईने ऑस्ट्रेलियामध्ये स्काय डायविंगचा चित्तथरारक अनुभव घेतला. MAAI साठी सर्व मराठी कलाकारांनी सिडनी दौरा केला. सईने मात्र आपला ऑस्ट्रेलियामधील मुक्काम वाढवला आणि ‘द ग्रेट बॅरिअर रीफ’ ला स्कायडायविंगचा आनंद घेतला. सईने चक्क १५ हजार फुटांवरून उडी मारण्याचे धाडस केले. स्काय डायविंगचा चित्तथरारक अनुभव शेअर करताना सईने सांगितले, की मला नेहमीच अॅडवेंचरस गोष्टी करायला आवडतात आणि म्हणूनच मी स्कायडायविंग करण्याचे धाडस करु शकले.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, सईचा स्काय डायविंग करतानाचा खास व्हिडिओ आणि सोबतच छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...