आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुपरस्टार सलमानसोबत झाली आकाशची भेट, इंस्टाग्राम शेअर केले 'परशा'ने NEW PIX

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'सैराट' सिनेमामुळे अभिनेता आकाश ठोसरला रातोरात सुपरस्टार झाला आहे. मराठी सिने इंडस्ट्रीला नवा चॉकलेट बॉय मिळाला असेही म्हटले जाच आहे. त्याच्या 'गर्ल्स फॅन्स'ची संख्या तर दिवसागणिक वाढतंच आहे. सोशल मीडियावर तर आकाश छा गया है... फेसबुक, ट्विटरनंतर आता इंस्टाग्रामवरसुद्धा आकाशला फॉलो केलं जातंय.

आकाशचे इंस्टाग्राम पेज बघितले असता, बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानसोबतचा त्याचा एक लेटेस्ट फोटो बघायला मिळाला. नुकतीच आकाशची सलमानसोबतची भेट झाल्याचे यावरुन समजते. 'सैराट' सिनेमाची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केले आहे. अभिनेता सलमाननेसुद्धा या सिनेमाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले असून अलीकडेच तो 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'झिंग झिंग झिंगाट' गाण्यावर ताल धरताना दिसला. या छायाचित्रात सलमानला भेटल्याचा आनंद आकाशच्या चेह-यावर स्पष्ट दिसतोय. आता लवकरच तो महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमातही झळकणार आहे.

एकंदरीतच काय तर आकाश मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांना टफ फाईट देईल, असे म्हणायला हरकत नाही.

पाहुयात, आकाशच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर झालेली लेटेस्ट छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...