आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंगड्या-सल्याने पहिल्यांदाच केला विमान प्रवास, म्हणाले एअर होस्टेस 'लय भारी'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या ‘सैराट’ या सुपरहिट मराठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पेशल स्क्रिनिंगला सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री रिंकू राजगुरू, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख आणि अनुजा मुळे पोहोचले होते. तेलंगणातील महाराष्ट्र मित्र मंडळाने 'सैराट'च्या टिमला आमंत्रित केले होते.
स्क्रिनिंगच्या निमित्ताने लंगड्या अर्थातच अभिनेता तानाजी गळगुंडे आणि सल्या म्हणजेच अरबाज शेख यांना पहिल्यांदाचा विमान प्रवास करण्याची संधी मिळाली. पुणे ते हैदराबाद असा तासाभराचा प्रवास त्यांनी विमानाने केला. आपल्या पहिल्या विमानप्रवासातील गंमती जमती त्यांनी शेअर केल्या.
पुणे ते हैदराबाद असा विमानप्रवास या दोन मित्रांनी केला असून विमान पाहून ते भारावले. तसेच विमानात बसल्यानंतर लय भारी वाटल्याचे तानाजीने म्हटले. विमानातील एअर होस्टेस पाहिल्या का, या प्रश्नावर दोघांनीही हसत-लाजत हो म्हटले. एअर होस्टेस मस्त होत्या, भारी होत्या अशी साधी-सरळ प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तर दोघेही विमानाच्या खिडकीतून केवळ बाहेरच पाहात होते. प्रदीप तर फ्लाईटमध्ये बसून आलो, ऐवजी फ्लॅटमध्ये बसून आलो, असेच म्हणत असल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, हैदराबाद येथे आलेल्या सैराटच्या टीमचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...