आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल 3 महिन्यानंतर कडेकोट बंदोबस्तात अकलूजमध्ये पोहोचली रिंकू, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिंकूची एक झलक बघण्यासाठी जमलेली चाहत्यांची गर्दी पहिल्या छायाचित्रात तुम्ही बघू शकता. - Divya Marathi
रिंकूची एक झलक बघण्यासाठी जमलेली चाहत्यांची गर्दी पहिल्या छायाचित्रात तुम्ही बघू शकता.
अकलूज (सोलापूर) : 'सैराट' सिनेमाच्या प्रदर्शानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु रविवारी पहिल्यांदाच अकलूजमध्ये पोहोचली. यावेळी रिंकूचे जोरदार स्वागत झाले. अकलूज ग्रामस्थांच्या वतीने रिंकूसह राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने आणि अकलूजच्या इतर 12 कलावंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ग्रामस्थांकडून सत्कार घेण्यासाठी रिंकू अकलूजमध्ये पोहोचली खरी, मात्र चाहत्यांच्या अलोट उत्साहामुळे तिला बाहेर पडणेच अवघड झाले होते.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडीतून संध्याकाळी 6 वाजता सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात रिंकू कुटुंबासह स्मृती भवनमध्ये पोचली. पण बाहेर येताच स्मृती भवनच्या बाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली. या चाहत्यांसाठी बाहेर स्क्रिन लावण्यात आला होता. यावर रिंकूचे शूटींग मोबाईलवर करून चाहत्यांना समाधान मानावे लागले.
अकलूज येथील चित्रपट क्षेत्रातील उज्वल परंपरा राखताना रिंकू हिने अकलूजवासियांचे नाव मोठे केल्याचे सांगत, तिला महाराष्ट्रीयन फेटा बांधून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना ‘अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची’ हा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी बोलताना रिंकू म्हणाली, मी खूप लाजरी-बुजरी होते. नागराज मंजुळेंनी माझ्यातील खरी आर्ची बाहेर काढली.
पुढे वाचा, 'सन्मान कलावंतांचा, नावलौकिक अकलूजचा' हा कार्यक्रम अर्धवट सोडूनच का निघावे लागले रिंकूला... आणि सोबतच बघा रिंकूची एक झलक बघण्यासाठी अकलुजकरांनी कशी केली होती गर्दी...
बातम्या आणखी आहेत...