आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • यांच्या उल्लेखाशिवाय \'सैराट\' अपूर्णच, पाहा परशा अर्चीसोबतच हे ही आहेत यशाचे भागीदार

सैराटमध्ये यांचा अभिनयही प्रेक्षकांच्या काळजाला चटका लावून गेला, हे सुध्दा आहेत यशाचे भागीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र 'सैराट - झिंगाट' सुरू आहे. चित्रपटाने छप्परफाड कमाईही केली आहे म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतूल आणि चित्रपटाचे स्टारकास्ट म्हणून रिंकू राजगुरू (अर्चना) आणि आकाश ठोसर (प्रशांत) यांचेही विशेष कौतूक आहे. मात्र या चित्रपटाच्या यशात यांच्यासोबत आणखी दोन नावे महत्त्वाची आहेत. ती म्हणजे चित्रपटातील 'प्रदीप बनसोडे' चे पात्र साकारणारा तानाजी गलगुंडे आणि 'सलीम शेख' साकारणारा अरबाज शेख. हा चित्रपट या दोघांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे असे म्हणावे लागेल.
या दोघांचा उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटातील त्यांची मैत्री ही काळजाचा ठाव घेणारी आहे. दोघांनाही अभिनयाचा गंध नसताना चित्रपटात प्रेक्षकांची मने अर्ची-परशा सोबतच या दोघांनीही जिंकलीत. म्हणूनच सोशल नेटवर्कींगवर "मित्र असावेत तर प्रदीप-सलीम सारखे" अशा पोस्ट फिरताना दिसतात. प्रसिध्दीपासून कोसोदूर असलेले हे दोन मित्र प्रत्येक प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रुपात अवतरतातच... म्हणून आज आम्ही खास तुमच्यासाठी या दोघांचे UNSEEN PHOTOS आणले आहेत. ते पाहून नक्कीच तुम्हाला जीवनातील "प्रदीप-सलीमची" नक्की आठवण येईल...
पुढील स्लाईडवर वाचा, प्रदिप आणि समिल चित्रपटात कसे मदत करतात परशा आणि आर्चीला... अशी दिसते या चौघांमधील मैत्री.... तसेच प्रदीप-सलीमचे तुम्ही न पाहिलेले फोटो आणि सैराटच्या स्टारकास्टचेही UNSEEN PHOTOS...
(टीप- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही माहिती शेअर करा.)