आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटबारीवर \'सैराट\'ची तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई, \'नटसम्राट\'चा रेकॉर्ड काढला मोडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : झी स्टुडिओजची निर्मिती असलेला, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळाले आहे. सैराटने पहिल्या तीन दिवसांत सुमारे 12 कोटी 10 लाखची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केलाय. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने तब्बल 3.55 कोटींची बक्कळ कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी 3.70 आणि तिसऱ्या दिवशी रविवारी सैराटने 4.85 कोटींची कमाई केली. तिन्ही दिवस मिळून या सिनेमाने 12.10 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करुन नटसम्राटचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
याचवर्षी रिलीज झालेल्या ‘नटसम्राट’ने रिलीजच्या तीन दिवसांत दहा कोटींची, एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसांत नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 40 कोटींच्या घरात गेला होता.
'सैराट' महाराष्ट्रात जवळ जवळ 400 थिएटरमध्ये 8500 शोजसह झळकला असून वीकेडंला सिनेमाचे जवळपास 100 टक्के शो हाऊसफुल होते. आता या सिनेमांना मागे टाकत 'सैराट' बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड प्रस्थापित करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एक नजर टाकुया यापूर्वी बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेणा-या काही निवड सिनेमांवर...
सिनेमा एकुण कमाई
नटसम्राट सुमारे 40 कोटी
लय भारी सुमारे 38 कोटी
टाइमपास सुमारे 33 कोटी
कट्यार काळजात घुसली सुमारे 31 कोटी
टाइमपास 2 सुमारे 28 कोटी
दुनियादारी सुमारे 26 कोटी
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सुमारे 22 कोटी
क्लासमेट्स सुमारे 21 कोटी
डबल सीट सुमारे 20 कोटी


पुढे वाचा, अनुराग कश्यप यांनी केले 'सैराट'चे कौतुक...
बातम्या आणखी आहेत...