आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैराट'च्या लंगड्याचा येतोय दुसरा सिनेमा, या सिनेमात झळकणार आहे तानाजी गलगुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या ‘सैराट’ या चित्रपटात लंगड्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गलगुंडे लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तानाजीचा दुसरा सिनेमा याचवर्षी रिलीज होणार असून त्याच्या या नवीन चित्रपटाचे नाव आहे माझा अगडबम. तृप्ती भोईरची दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून यात तानाजीची झलक बघायला मिळत आहे. या चित्रपटात तानाजीने एका आखाड्याच्या मॅनेजरची भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याचा ग्लॅमरस आणि गावरान अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. रेसलिंगच्या रिंगमध्ये WWF चॅम्पिअन आणि नाजुका यांच्यातील दमदार सामना आणि सोबतच फॅमिली ड्रामा प्रेक्षकांना या चित्रपटात बघता येणार आहे. 
 
'सैराट' चित्रपटाच्या यशानंतर तानाजीला हिंदी शोचीसुद्धा ऑफर मिळाली. ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत तानाजी झळकला. आता 'माझा अगडबम' या चित्रपटातून तो पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सज्ज झाला आहे. 

पाहुयात, 'माझा अगडबम' या चित्रपटातील तानाजीची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडवर चित्रपटाचा ट्रेलर... 
बातम्या आणखी आहेत...