आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics : बाप्पाच्या भक्तीत रमली \'आर्ची\'ची \'आई\', स्वतः साकारली शाडूची मुर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेः मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या 'सैराट'मध्ये आर्चीच्या आईची भूमिका वठवणा-या अभिनेत्री भक्ती चव्हाण यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. मुळच्या उस्मानाबादच्या भक्ती आता पुण्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्या पुण्याच्या घरी 11 दिवस बाप्पा विराजमान होते. पारंपरिक पद्धतीने त्यांनी गणेशोत्सव साजरा केला. 
 
गणेशोत्सवाबद्दल भक्ती म्हणतात, "गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा सण आहे. माझ्या तर तो खूप आवडीचा सण आहे. आमच्या घरी गणेश आगमनाची 2 महिन्यांआधीपासून तयारी सुरू असते. मी स्वतः शाडू पासून दरवर्षी गणेशाची मूर्ती बनवीत असते. गणेशाच्या कृपेने मला खूप काही मिळालं आहे. त्याची कृपादृष्टी माझ्यावर नेहमी असते. गणेशाची सेवा केल्याने मनशांती मिळते. गणेश आगमनानंतर घरात वातावरण प्रसन्न होते. आज गणेशाला निरोप देताना करमत नाहीये."  गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या, म्हणत भक्ती आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत. 
 
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'च नव्हे तर याआधी 'फँड्री'तही त्यांनी काम केले होते. 'फँड्री'त त्यांनी पाटलीणीची भूमिका केली होती. फँड्रीनंतर त्यांनी कोकणस्थ, हॅपी जर्नी, हेल्पलाईन, झाड, उणीव यांसारख्या चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली. 'स्त्रीकुट्ट' या नाटकाद्वारे त्यांनी अभिनयास सुरुवात केली. 
 
भक्ती यांना एक मुलगी असून मिताली हे तिचे नाव आहे. भक्ती आणि मिताली यांचे गणेशोत्सव साजरा करतानाचे खास फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
फोटो - गणेश जगताप 
बातम्या आणखी आहेत...