आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'च्या \'आक्का\'च्या घरचा गणेशोत्सव, मालवणातील घरी 7 दिवसांसाठी बाप्पा येतो पाहुणचाराला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सैराट' या चित्रपटातील सुमन आक्का अर्थातच अभिनेत्री छाया कदम यांच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. छाया कदम या मुळच्या करंबळ (ता. मालवल जिल्हा सिंधुदुर्ग) येथील आहेत. त्यांच्या मालवणातील घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सात दिवस गणरायाची पूचा-अर्चा केल्यानंतर त्यांनी बाप्पाला निरोप दिला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने छाया त्यांच्या गावी गेल्या होत्या. विसर्जनानंतर त्या आता मुंबईला परतल्या आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बाप्पासोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, ''माझ्या घरचा बाप्पा.''   

छाया कदम या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सैराट या चित्रपटात त्यांनी सुनम आक्काची भूमिका साकारली होती. धामापूर हे त्यांचे आजोळ आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला असून घरी आई आणि भाऊ आहे. त्यांचा भाऊ धामापूर येथे वास्तव्याला आहे. छाया यांना वामन केंद्रेंच्या 'भूलवा' नाटकातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी बाई माणूस, बाबू बँड बाजा, मी सिंधूताई सपकाळ, हायवे, हलाल यांसह अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. याशिवाय अजय देवगण स्टारर 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमातही त्यांनी एक महत्त्वाची भूमिका वठवली होती. भिडू, झेल्या, दुरांतो, आटपाडी नाइट्स हे छाया कदम यांचे सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. त्यांच्या 'दुरांतो' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
 
मिलिंद शिंदे यांच्या भिडू आणि कृष्णा कांबळे यांच्या 'झेल्या' या सिनेमातील भूमिकांसाठी छाया यांना कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मिलिंद शिंदे आणि वामन केंद्रे हे दोघेही छाया कदम यांना या क्षेत्रात गुरुस्थानी आहेत. इथवरचा प्रवास या दोघांच्या पाठिंब्यामुळेच झाल्याचे त्या सांगतात. छाया कदम या स्टेट लेव्हलच्या कबड्डीपटू राहिल्या आहेत. व्यायामाची त्यांना आवड आहे.

पाहुया, छाया कदम यांच्या घरच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...