आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: \'सैराट\'च्या \'परशा\'ला बॉलिवूडची लॉटरी? \'मेरी कोम\'च्या दिग्दर्शकाच्या बर्थडे पार्टीत हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माता संदीप सिंग, दिग्दर्शक ओमंग कुमार आणि अभिनेता रोहित रॉयसोबत \'सैराट\' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आकाश ठोसर - Divya Marathi
निर्माता संदीप सिंग, दिग्दर्शक ओमंग कुमार आणि अभिनेता रोहित रॉयसोबत \'सैराट\' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आकाश ठोसर

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्या बर्थडे पार्टीत एका मराठमोळ्या चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'मेरी कोम' आणि 'सरबजीत' या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे ओमंग कुमार यांच्या पार्टीत दिसलेला हा मराठमोळा चेहरा होता 'सैराट' फेम आकाश ठोसर. चकीत झालात ना... आकाश आणि हिंदी दिग्दर्शकाच्या बर्थडे पार्टीत कसा काय? हा प्रश्न पडणे तसे स्वाभाविकच आहे. या भेटीमागचे रहस्य काय हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र उमंग कुमार आता ‘दे धक्का’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी सिनेमाचा लवकरच हिंदीत रिमेक बनवणार आहे. या सिनेमामुळे त्यांचे मराठी सिनेसृष्टीशी संबंध जोडले गेले आहे. त्यांच्या वाढदिवसाला आकाश गेल्याने तो आता एखादा हिंदी सिनेमा करत आहे का अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
आकाश ‘सैराट’नंतर महेश मांजरेकर यांच्या एका मराठी सिनेमात काम करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या सिनेमाचे शूटिंगही सुरु झाले. पण त्याने आतापर्यंत कोणत्याही हिंदी सिनेमात काम करण्यासाठी करार केला नव्हता. ओमंग यांच्या वाढदिवसाला आकाश गेल्याने त्यानेही आता बॉलिवूडची वाट धरली असल्याचे चित्र दिसत आहे. ओमंगच्या या पार्टीत आकाश संदीप सिंगसोबत आला होता. संदीप ‘मेरी कोम’ या सिनेमाचा सहनिर्माता तर ‘सरबजीत’ या सिनेमाचा निर्माता होता. आकाश पार्टीतही सतत संदीपसोबतच होता. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या पार्टीत निर्मात्याबरोबर गेलेला आकाश लवकरच बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात झळकला तर आश्चर्य वाटायला नको.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, ओमंग कुमार यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या आकाश ठोसरची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...